आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरांना डावलून मोंदींना कुंभाचे अावतन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभ मेळ्यासारख्या महापर्वणीचे स्थानिक पातळीवर यजमान असलेले नाशिककर अाणि प्रथम नागरिक म्हणून या सर्वांचा प्रमुख ठरणाऱ्या महापाैरांनाच दिल्लीत असूनही पंतप्रधानांना अामंत्रण देण्याच्या भेटीपासून मुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी वंचित ठेवल्याची बाब अाता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली अाहे. यापूर्वी शिवसेनेचे खासदार हेमंत गाेडसे पुराेहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पंतप्रधानांच्या भेटीपासूनही महापाैरांना दूर ठेवल्यामुळे जाणीवपूर्वक प्रयत्न तर नाही ना, अशीही शंका घेतली जात अाहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याला १४ जुलै २०१५ राेजी हाेणाऱ्या ध्वजाराेहणाने सुरुवात हाेत असून, या उत्सवाला उपस्थित राहण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन अामंत्रण दिले.

माेदी यांनी स्वत: या उत्सवाला भाविकांची गैरसाेय हाेणार नाही, याची काळजी घेऊन उपस्थित राहू, असेही अाश्वासन दिले. विशेष म्हणजे, हे अामंत्रण देण्याची प्रक्रिया सुरू असताना नाशिकचे महापाैर अशाेक मुर्तडक हे दिल्लीत स्मार्ट सिटीच्या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित हाेते.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्थानिक पातळीवरील यजमानांचे प्रतिनिधी म्हणून महापाैरांना सहज नेता अाले असते. मात्र, प्राेटाेकाॅलचे कारण दाखवत त्यांना त्यापासून दूर ठेवल्याची चर्चा राजकीय गाेटात अाहे. नाशिकमध्ये मनसे भाजपमध्ये चांगलेच हाडवैर असून, यापूर्वी एकत्रितरीत्या महापालिकेत उभयंतांची युती हाेती. दरम्यान, महापाैरांच्या भेटीच्यानिमित्ताने उगाच मनसेला महत्त्व नकाे म्हणूनही संपूर्णत: भाजपशी संबंधित निमंत्रण प्रक्रिया केली गेल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

महापाैर यापूर्वीही लांबच
यापूर्वीशिवसेनेचे खासदार गाेडसे पुराेहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माेदी यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचे अामंत्रण दिले हाेते. त्यावेळीही महापाैरांना प्रथम नागरिक म्हणून नेण्याचे साेडून लांब ठेवल्यामुळे चांगलीच टीका टिप्पणीही झाली हाेती. कुंभमेळ्याचे राजकारण हाेत असल्याचेही अाराेप झाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...