आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालय निर्णयात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप का? फरांदे-गिते वादावरून शिवसेनेचे टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिलांच्या शंभर खाटांच्या रुग्णालयाच्या जागेवरून भाजप अामदार देवयानी फरांदे विरुद्ध भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते त्यांचे पुत्र उपमहापाैर प्रथमेश गिते यांच्या वादात थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याविराेधात शिवसेनेने टीकास्त्र साेडले अाहे.
 
जागा देण्याचा निर्णय महापालिकेचा असताना त्यात नाशिक दत्तक घेतले म्हणून मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेपाचा अधिकार दिला काेणी, असा सवाल विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी केला अाहे. जागा देण्याबाबत गुपचूप परस्परविराेधी ठराव पाठवण्यापेक्षा महासभेत चर्चा मतदानाद्वारे निर्णय घ्यावा असे सांगत बाेरस्ते यांनी भाजपला खिंडीत गाठले. 
 
प्रथम संदर्भ सेवा रुग्णालय, त्यानंतर वडाळा पुढे भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या अावारात रुग्णालय करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, या जागेला भाभानगर येथील स्थानिक रहिवासी गिते यांनी अाक्षेप घेतला. पार्किंग अन्य तांत्रिक अडचणींमुळे रुग्णालय हाेऊ देण्याची त्यांची भूमिका अाहे. मात्र, फरांदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचाच काैल पदरात पाडून घेतल्यामुळे रुग्णालय करण्यासाठी पालकमंत्र्यांनी कंबर कसली अाहे. त्यामुळेच की काय, यापूर्वी महासभेत मागील दरवाज्याने रुग्णालय भाभानगरएेवजी टाकळी येथे व्हावे असा ठराव झाला असताना ताे रद्द करून पुन्हा मागील दरवाज्याने भाभानगर येथेच रुग्णालय करण्याचा ठराव झाला. या जागेवरून गिते विरुद्ध फरांदे असा वाद चिघळला असताना त्यात राष्ट्रवादी कांॅग्रेस, अापने उडी घेतली असताना, शिवसेनेनेही दंड थाेपटले अाहेत. 

बाेरस्ते यांनी पत्रकार परिषदेत भाजपबराेबरच मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. ते म्हणाले की, मुळात रुग्णालय झालेच पाहिजे अशी भूमिका अाहे; मात्र जागा काेणाची हे मुख्यमंत्र्यांनी परस्पर ठरवणे याेग्य नाही. जागा महापालिकेची असून त्यासाठी महासभेत रीतसर प्रस्ताव मांडून चर्चा झाली पाहिजे. मतभेद असेल तर मतदानही घेतले पाहिजे. मात्र, मागील दरवाज्याने परस्पर विषय मंजुरीचे अधिक दिले काेणी? मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले याचा अर्थ त्यांना पालिकेचे अधिकार मिळाले असे हाेत नसल्याची टीका बाेरस्ते यांनी केली. 
 
भाभानगर येथे स्वाक्षरी माेहीम 
महिलांचेशंभर खाटांचे रुग्णालय दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या अावारात उभे राहिल्यास पार्किंगसह अाराेग्याचा प्रश्न उभा ठाकणार असल्याचा अाक्षेप घेत त्याला विराेधासाठी स्थानिक नागरिकांनी नाेव्हेंबरपासून स्वाक्षरी माेहीम सुरू केली अाहे. माजी अामदार वसंत गिते उपमहापाैर प्रथमेश गिते हेही त्यात उतरले अाहेत. भाभानगर येथील जाॅगिंग ट्रॅकवर सायंकाळी वाजता स्वाक्षरी माेहीम हाेणार अाहे. पालकमंत्र्यांनी फरांदे यांच्या बाजूने काैल देत रुग्णालय गायकवाड सभागृहाच्या अावारातच हाेणार असल्याचे सांगितल्यानंतरही गिते यांनी दंड थाेपटल्यामुळे भाजपअंतर्गत पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध टाेकाला गेल्याचे चित्र अाहे. 
बातम्या आणखी आहेत...