आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमृत्यूची जबाबदारी घेत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; विखे पाटील यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘समृद्धी महामार्ग आणि मेट्रो रेल्वेच्या स्वप्नातून आता मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडून कुपोषण आणि बालमृत्यूसारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ असा कार्यक्रम सुरू आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता बोलायचे सोडून काम करण्याकडे लक्ष द्यावे’, असा टाेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी लगावला. नाशकात झालेले ५५ बालमृत्यू हे सरकारचे मोठे अपयश असून, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर या बालमृत्यूची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही विखे यांनी केली.  ‘आदिवासी मंत्र्यांच्याच मतदारसंघात कुपोषणामुळे बालमृत्यूच्या घटना घडत आहेत. मात्र, संबंधित मंत्री याकडे ‘रेनकोट’ खरेदी करण्यात व्यस्त आहे,’ असेही विखे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...