आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलीकरच्या लाचखोरी प्रकरणी आणखी चार जणांची नावे पुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लाचखोर अभियंते सतीश चिखलीकर व जगदीश वाघ यांची चौकशी केली असता बांधकाम विभागाचा सर्वच कारभार संशयास्पद आहे की काय? असा प्रश्न पडावा असे चित्र आल्याचे मत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी यांनी बुधवारी व्यक्त केले. या प्रकरणात आणखी चार नावे हाती आली असून योग्य वेळ आल्यावर ती जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.


चिखलीकर लातूरमध्ये असताना एक हजार कोटींची कामे झाली होती. विविध शहरांत मालमत्ता सापडत असताना लातुरात मात्र काहीच कसे सापडले नाही? या प्रश्नावर लातूर येथील शाखेला माहिती देण्यात आली असून लवकरच निष्कर्ष समोर येतील, असे ते म्हणाले.


राजकीय दबाव नाही : मुख्यमंत्र्यांनी मोकळ्या हाताने काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चौकशीत राजकीय दबाव नसल्याचे खिलनानी यांनी स्पष्ट केले.