आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिक्की : दोन अहवालांचे विराेधी निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
नगर- अंगणवाडीतील बालकांसाठी पुरवठा करण्यात आलेली सूर्यकांता राजगिरा चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेने दिला आहे. दरम्यान, नाशिक येथील प्रयोगशाळेने चिक्की खाण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी शुक्रवारी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सूर्यकांता संस्थेमार्फत राजगिरा चिक्कीचा पुरवठा करण्यात आला होता. ही चिक्की मातीमिश्रित असल्याची तक्रार नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी केली होती. त्यानंतर या चिक्कीचे जिल्हाभरातील वाटप थांबवण्यात आले. मागील सर्वसाधारण सभेत चिक्कीचे नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे ठरले होते.
त्यानुसार जिल्हा परिषदेने यापूर्वीच दोन सरकारी दोन खासगी प्रयोगशाळांत चिक्की तपासणीसाठी पाठवली होती. त्याबरोबरच अन्न आणि आैषध प्रशासनानेही चिक्कीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यानुसार महिनाभरापूर्वी दोन सरकारी प्रयोगशाळांनी चिक्की खाण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला होता. पण अन्न आणि आैषध प्रशासनाच्या अहवालात चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी अन्न आणि आैषध प्रशासनाने चिक्की पुरवठादाराला नोटीसही बजावली आहे.
शुक्रवारी जिल्हा परिषदेने पाठवलेल्या दोन खासगी प्रयोगशाळांचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. गुंड म्हणाल्या, पुणे येथील प्रयोगशाळेने चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा, तर नाशिक येथील प्रयोगशाळेने चिक्की खाण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवण्यात येईल, असेही गुंड यांनी सांगितले. दोन अहवाल चिक्की खाण्यास अयोग्य, तर तीन अहवालात चिक्की खाण्यास योग्य असल्याचे परस्परविरोधी अहवाल आहेत. त्यामुळे आता कोणत्या प्रयोगशाळेचा अहवाल खरा मानायचा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गुंड यांनी बालकांसाठी पुरवठा करण्यात आलेले शतावरी बिस्कीट, गर्भवती मातांसाठी स्तनदा मातांसाठी वाटप करण्यात आलेल्या बिस्किटांची माहिती घेतली.

बिस्किटांचीही तपासणी करा
शतावरी बिस्किटांची लाख १९ हजार ९४० पाकिटे अंगणवाडीतील बालकांसाठी, गर्भवती मातांसाठी ८५ हजार ९९५, तर स्तनदा मातांसाठी ८६ हजार २५ बिस्कीट पाकिटे प्रकल्प स्तरावर शासनाकडून जिल्ह्यात पुरवठा करण्यात आली. या बिस्किटांची पाकिटेदेखील तपासणीला पाठवा, असे तोंडी आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष गुंड यांनी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाला दिले. यावर विभागातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्याने जूनलाच आयुक्त कार्यालयाकडे तपासणीला पाठवले असल्याची माहिती अध्यक्ष गुंड यांना दिली.

राज्य सरकारनेचिक्कीप्रकरणी महिला बालकल्याण अायुक्तांवर पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. जर हे शासनाला जमत नसेल तर आम्ही आयुक्त पुरवठादारावर गुन्हा दाखल करू. -संदेश कार्ले, सभापती, पंचायत समिती, नगर