आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकलाकारांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड- प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देत बालकलाकारांनी नाटिकेच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. मंदिराच्या वास्तुपुरतीच श्रद्धा मर्यादित ठेवता आपली भूमी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याची आठवण बालकलाकारांनी करून दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची नाशिक रोड शाखा जय श्रीराम फाउंडेशनच्या वतीने नाशिक रोडच्या महात्मा गांधी टाउन हॉलमध्ये मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांचा तीन तासांचा ‘बीट‌‌्स ऑफ गिगल किड‌‌्स’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी सादर केला. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुंबईच्या बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून प्राचीन परंपरा जपत, एकता पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. बालकलाकारांच्या अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवले. गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कचऱ्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांची जाणीव करून देणारी नाटिका, वासुदेवभक्तीत तल्लीन झालेली वारकऱ्यांची दिंडी, कोकणी नृत्य, लावणी, मंगळागौर, दहिहंडी, आईचा गोंधळ, नाशिकचा ढोल आणि लेजीम तसेच गणेशोत्सवातील कोकणी बाल्या डान्स, आदिवासी ग्रामीण परंपरेचे दर्शन घडवणारी कलाकृती बालकलाकारांनी सादर केली. छत्रपती शिवराय अफजलखान यांच्या भेटीच्या प्रसंगावरील शॅडो डान्स आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे संयोजन रोहित पालवे, सागर टिळे, आशिष सोनवणे, जयेश धोगडे, शंतनू निसाळ यांनी केले. प्रारंभी नगरसेविका सविता दलवाणी, मसापच्या नाशिक रोड शाखेचे अध्यक्ष उन्मेष गायधनी, जय श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन हांडगे, ओमप्रकाश बाहेती यांच्या उपस्थितीत उद‌्घाटन झाले.
नाशिकच्या बालिकेची बालकलाकारांना भेट
जेल रोडला राहणाऱ्या जान्हवी सुभाष लोळगे (वय ७) या बालिकेने वर्षभर बचत केलेले दि. मे रोजी वाढदिवसाला जमा झालेले सर्व पैसे मुंबईच्या या बालकलाकारांना भेट म्हणून दिले. बालिकेच्या निर्णयाचे लाइम लाइट फाउंडेशनने तोंडभरून कौतुक केले.
बातम्या आणखी आहेत...