आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिक्षा-ट्रक अपघातात बालकाचा मृत्यू, नाशिकातील हृदयद्रावक घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूररोडवर डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांची रिक्षा आणि ट्रकमध्ये गुरुवारी झालेल्या अपघातात चार वर्षीय भविष्य सुवर्ण या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालकासह एक मुलगा जखमी झाला. इतर तीन विद्यार्थी मात्र सुखरूप आहेत. भविष्यच्या अपघाती मृत्यूने सुवर्ण कुटुंबीयांचे जणू भविष्यच उद्ध्वस्त झाले. याचबरोबर अवजड वाहनामुळे झालेल्या या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास रिक्षाचालक सुरेश जाधव हे आपल्या रिक्षाने (एमएच 15, झेड 7508) निघाले. त्यांनी चिन्मय देशपांडे या शेवटच्या विद्यार्थ्याला 11.45 वाजता रिक्षात बसविल्यानंतर रिक्षा शाळेकडे निघाली. दादोजी कोंडदेव पोलिस चौकीच्या पुढील चौकातून रिक्षा जात होती. याच वेळी होरायझन शाळेकडून येणार्‍या सीमेंटच्या ट्रकने (एमएच 19, झेड 6359) या रिक्षाला जोरदार ठोस दिली. यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील भविष्य विश्वनाथ सुवर्ण (वय 4) या ज्युनिअर केजीतील चिमुकल्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी श्लोक आढळकर (4)आणि रिक्षाचालक सुरेश जाधव जखमी झाले, तर या रिक्षातील इशांत खरमुरे, सायली बापट व चिन्मय देशपांडे हे तीन विद्यार्थी बचावले. जखमी श्लोकवर गंगापूररोडवरील सुर्शूत रुग्णालयात, तर जाधव यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना प्रसाद रेड्डी यांनी रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वारावरच आपले दु:ख अनावर झाल्याने भविष्यच्या आईला रडू कोसळले. यामुळे जिल्हा रुग्णालयावर जणू शोककळा पसरल्याचे जाणवत होते. डॉन बॉस्को शाळेचे फादर व कर्मचारी यांच्यासह या वेळी मदतीसाठी पुढे आलेल्यांनी या मातेचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या डोळ्यातले अर्शू थांबत नव्हते. भविष्यचे वडील डर्क इंडिया कंपनीत कुक म्हणून काम करतात. पती-पत्नी व एक मुलगा-मुलगी अशा या कुटुंबावर भविष्यच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अवजड वाहनांना प्रवेश नको
शहरातील रहिवासी भागातून वाळू-सीमेंट वाहणारे ट्रक तसेच इतर अवजड वाहने सर्रास दिवसाही वेगाने धावतांना दिसतात. या अवजड वाहनांना दिवसा या भागातून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. रात्री 10 वाजेनंतरच अशा अवजड वाहनांना या भागातून जाण्यास परवानगी दिलेली असताना, दिवसाही ही अवजड वाहने रहिवासी भागातून वेगाने जातात. दिवसाच्यावेळी या रस्त्यांवरून विद्यार्थ्यांची शाळेतून ये-जा सुरू असते. त्यांची वाहतूक असुरक्षित होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अवजड वाहनांवर असलेल्या दिवसा वाहतुकीच्या बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.