आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासचा मृतदेह पाण्याच्या टाकीत; नाशिकमध्ये पाच दिवसांत आठ घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शरणपूररोड परिसरातून बेपत्ता झालेल्या श्रीनिवास अर्शुबा शिरसाठ या मुलाचा मृतदेह सोमवारी पाण्याच्या टाकीत सापडला. पाठोपाठ घडलेल्या पाच संशयास्पद घटनांतील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने शहरातील पालक चिंतित झाले असून, यामागील गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
जैतुननगरमधील श्रीनिवास दोन दिवसांपूर्वी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह सोमवारी मिशन मळा भागातील संजय काळस्कर चाळ व ऑटोस्किलजवळील पाण्याच्या टाकीत तरंगताना आढळला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आठ दिवसांत पाच घटना
आठ दिवसांत अपहरण व बेपत्ता होण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. आडगाव व अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन शालेय मुलींचे अपहरण करण्यात आले होते. मुलींनी प्रसंगावधान राखत स्वत:ची सुटका करून घेतली, तर पंचवटीतील सीतागुंफा येथील पुणे विद्यार्थी वसतिगृह येथून दोन मुलांचे अपहरण करण्यात आले. यातील एकाचे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले तर दुसर्‍याचा अद्याप शोध लागलेला नाही.
पोलिस झाले निष्क्रिय
शहरात आठ दिवसांत पाच अल्पवयीन मुलांचे अपहरण होऊनही पोलिस प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करीत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त सध्या शहरात नसल्याने गस्त पथक, बीट मार्शल, गुन्हे शाखा, निर्भया पथकदेखील निष्क्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. नाकेबंदीही शिथील करण्यात आली असल्याने गुन्हेगारांना जणू रान मोकळे झाले आहे. नाशिकरोड येथे घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत लाखोंची चोरी करण्यात आली.