आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात खेळताना बालकाचा दुर्दैवी मृत्यू, अाईला चाहूल लागण्याच्या अात अकाली संपले खेळकर ‘अायुष्य’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - घरातच खेळता खेळता सोफ्यावरून खिडकीवर चढलेल्या दाेन वर्षीय बालकाचा फरशीवर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अायुषचे जीवन असे फुलत असतानाच अकाली संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत अाहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील चेहडी पंपिंग स्टेशन परिसरातील बनकर मळ्यात साई अपार्टमेंटमध्ये भागवत तांदूळकर राहतात. रविवारी सायंकाळी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा आयुष घरात खेळत होता. यावेळी त्याची आई आतल्या खाेलीत कामात मग्न होती. आयुष नेहमी घरातच खेळत असल्याने त्या काहीशा निर्धास्त हाेत्या. अवघ्या दोन वर्षांचा आयुष खिडकीपर्यंत वर चढेल, असे कोणालाही वाटले नाही. मात्र, तो खिडकीला लागून असलेल्या सोफ्यावर अाणि तेथून खिडकीचे गज धरीत वर चढला. हाताला कळ लागल्याने किंवा पाय सरकल्याने तेथून त्याचा तोल गेला आणि ताे फरशीवर पडला. डाेक्याला जाेरात मार लागल्याने ताे रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज येताच आईने धावत जाऊन त्याला तत्काळ उचलले. मार डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला हाेता. त्याला तातडीने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुलांवर लक्ष ठेवावे...
^प्रत्येक पालकाने आपला मुलगा किंवा मुलगी घरातच खेळत असले तरी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची नितांत गरज आहे. पालकांचे थोडेही दुर्लक्ष झाले तरी एखादी वाईट घटना नकळत घडून जाते. -भागवत तांदूळकर, आयुषचे वडील
बातम्या आणखी आहेत...