आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात डेंग्यूमुळे सातवर्षीय बालिकेचा मृत्यू, आैषध फवारणीचा प्रश्न पुन्हा गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नाशिक - नाशकात डेंग्यूच्या तापामुळे अनेक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्या घटना घडली आहे. जिल्ह्यातही डेंग्यूचा ताप फैलावत आहे. मंगळवारी (दि. १२) जुने नाशिक भागातील एका सात वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर जुन्या नाशकातील आैषधफवारणीचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. 
 
जुने नाशिक येथील हरी मंझिल येथे राहणाऱ्या आयेशा शेख या सात वर्षीय चिमुरडीचा मंगळवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाला. डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आढळल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी सुरू होते. तेथे तिचा मृत्यू झाला. शहरात पावसाने ओढ दिल्यानंतर डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. धूरफवारणी औषधफवारणीची बोंब असल्याने शहरातील डासांची संख्या वाढल्याने आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ६० हून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. 

जवळपास १५० हून अधिक संशयित रुग्णही आढळून आल्याने डेंग्यूचा फैलाव वाढल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्याचे दुष्परिणाम डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. अचानक वाढलेली डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बनली आहे. मात्र, तरीही शहरात डेंग्यू नियंत्रणाखाली असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...