आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Health News In Marathi, Cartoons, Yoga, Divya Marathi

मुलांच्या आरोग्य संवर्धनासाठी कार्टून्सचा उप‘योग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुलांच्या दैनंदिनीतून खेळ आणि व्यायाम जवळपास हद्दपार झाल्याने चिंतित असलेल्या पालकांसाठी तणावमुक्तीचा अक्सीर इलाज उपलब्ध झाला आहे. दूरचित्रवाणीवर दिवस-दिवसभर कार्टून्स पाहत बसणार्‍या मुलांच्या याच सवयीचा उपयोग योग शिकवण्यासाठी करण्याचा फंडा योगगुरू रामदेवबाबा यांनी शोधून काढला असून, ‘काट्याने काटा’ काढणार्‍या या सीडीज्ना शहरात गेल्या काही दिवसांत चांगलीच मागणी आहे.


मोबाइल गेम आणि कार्टून्स शोमुळे मुलांचे बालपण हरवत असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. लहान मुले तासन्तास काटरून्स पाहत असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण येतो. तसेच, या शोकडे ते बराच वेळ लक्ष केंद्रित करीत असल्याने अन्य अभ्यासासह दैनंदिन जीवनातही मुलांची एकाग्रता मानसिक आजारही जडत असल्याचे सिद्ध होत आहे. अनेक पालकांचाही तसाच अनुभव आहे. मुलांच्या या सवयी बदलण्यासाठी काही पालकांनी कौन्सिलर वा मानसरोगतज्ज्ञांचाही रस्ता धरला आहे. परंतु, तरीही या समस्येतून मुक्तता मात्र होताना दिसत नाही.


हीच बाब हेरून रामदेवबाबांनी पारंपरिक योगाभ्यासाला काटरून्सच्या माध्यमातून मुलांसमोर आणले आहे. त्यात स्वत: रामदेवबाबांचे काटरून मुलांना योगाचे प्रकार करताना दाखवले जाते. एका वाहिनीवरही सकाळच्या सुमारास हे काटरून दाखविले जाते. ते पाहून सकाळी अनेक चिमुरडे योगाचे वेगवेगळे प्रकारही करताना दिसत आहेत. अर्थात या उपक्रमाद्वारे मनोरंजनातून आरोग्यसंदेश दिला जातो आहे.


काय आहे सीडीमध्ये.?
सीडी बनविताना अतिशय मनोरंजक पद्धतीने ही काटरून्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे लहान मुलांना सीडी पाहून तसे प्रयोग करण्यात रस वाटतो. सीडीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मुलांना बालवयापासूनच योग करण्याची चांगली सवय लागत आहे. ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. लहान मुले ही अनुकरणप्रिय असल्याचा विचार या संपूर्ण प्रयोगामागे ठेवण्यात आला आहे.