आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांची 8 पसंती तासांना, अाठवीपर्यंतच्या वर्गांचे दाेन तास वाढविण्याची शिक्षण विभागाची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नव्याराष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतच्या वर्गांची वेळ सहाऐवजी अाठ तास करण्याच्या शिफारशीचे शहरातील बहुतांश पालकांनी स्वागत केले अाहे, तर शिक्षक संघटनांनी या शिफारशीला विराेध दर्शवला अाहे. या शिफारशीबाबत शिक्षण संस्थांची भूमिका मात्र संमिश्र स्वरूपाची अाहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये पहिली ते अाठवीपर्यंत शिक्षकांनी किती तास अध्यापन करावे, यावर वेळेचे बंधन नाही. तसेच, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही. पहिली ते दहावीपर्यंतची शाळा सध्या सहा तासांची आहे. मात्र, यामध्ये दोन तासांची वाढ करून ती आठ तासांची करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शहराच्या तीन किलोमीटरच्या आतील शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश बंधनकारक असला तरी बहुतांश पालकांनी आपल्या आवडत्या शाळेत पाल्यांचा प्रवेश घेतला आहे. त्यामुळे बऱ्याच शाळांचे आणि घराचे अंतर हे तीन ते पंधरा किलोमीटरच्या दरम्यान आहे.

^शिक्षकांना एकूण दहा तास काम करावे लागणार अाहे. तसेच, विद्यार्थ्यांची मानसिकताही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. यामधून चांगले नाही तर दुष्परिणाम अधिक समाेर येतील. राजेंद्रनिकम, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघ

वेळेचा सदुपयाेग करावा
^मुलांच्या दृष्टीने हा चांगला निर्णय राहाणार आहे. वाढलेल्या वेळेचा सदुपयोग मुलांचा मैदानी खेळाच्या विकासासाठी लावावा. त्यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास मदत होईल आणि मुलांचे शाळेत मनही रमेल. संध्या गायकवाड, पालक

शाळा सात तास करावी
^शाळाएेवजी तास करावी. सरासरी मुले हे ३६५ दिवसांपैकी १७५ दिवस शाळेत येतात. सध्या मुले घरी गेल्यानंतर मोबाइल आणि टीव्हीचा आग्रह करतात. त्यापेक्षा शाळेत राहून विविध खेळांसाठी हा वेळ दिला तर उत्तम असणार आहे. -सचिन जोशी,शिक्षणतज्ज्ञ

दर्जेदार शिक्षणावर भर द्यावा
^शहरातील शाळा या दूर-दूर असल्याने मुलांचा वेळ प्रवासामध्येच जातो. त्यामध्ये अजून या दोन तासांची वाढ झाली तर मुले घराच्या सुमारे बारा तास बाहेर राहातील. त्यापेक्षा मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. सुलक्षणा धुमाळ, पालक

प्रायाेगिक तत्त्वावर वेळ वाढवावी
^शासनाने दोन तास वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्याऐवजी अगोदर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवावा. आठवड्यातून दोन दिवस करावे आणि त्यातून काय निष्पन्न होते त्यानुसार निर्णय घ्यावा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटी

असा होईल फायदा
{मुले खेळ आणि इतर उपक्रमांमध्ये प्रगत होतील.
{ खासगी क्लासेसऐवजी वर्गात अधिक शिक्षण होईल.
{ मोबाइल आणि टीव्हीपासून मुले अधिक वेळ दूर राहातील
{ शारीरिक आणि मैदानी खेळांमुळे विद्यार्थ्यांचा विकास होईल.

असे होईल नुकसान
{शाळेत जाण्यासाठी आणि घरी येण्यासाठी वेळ वाढेल.
{ मुलांची मानसिकता तणावपूर्ण होईल.
{ दोन सत्रांतील शाळांची गैरसोय होईल.
{शिक्षकांवरही वाढणार कामाचा तणाव.