आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बालकल्याण’ सभापतिपदी खैरे, शिवसेनेच्या नंदिनी जाधव यांची माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सत्ताधारीमनसेला साथ देणाऱ्या काँग्रेसच्या फरफटीचे शुक्लकाष्ट अखेर थांबले असून, महिला बालकल्याण समिती सभापतिपदावर बुधवारी काँग्रेसच्या वत्सला खैरे यांची अविराेध निवड झाली. मनसेने यंदाही उपसभापतिपदावर समाधान मानल्याने शीतल भामरे यांची अविराेध निवड झाली.

महापाैरपदाच्या नवडणुकीत मनसेला राष्ट्रवादीबराेबर काँग्रेसने उघडपणे मदत केली हाेती. शिवसेनेकडून काँग्रेसचे काही नगरसेवक फाेडण्याची खेळी सुरू हाेती. अशात काँग्रेसने एकसंघ राहून मनसेला महापाैरपद दिले. दरम्यान, सत्ता मिळाल्यानंतर मनसेकडून काँग्रेसला परतफेड झाली नाही. याउलट राष्ट्रवादी अपक्षांकडे महत्त्वाची पदे गेली. काँग्रेसमधील गटबाजीमुळे सत्ताधाऱ्यांना नेमका काेणाला न्याय द्यायचा, असा प्रश्न हाेता. दरम्यान, महिला बालकल्याण समिती निवडणुकीत वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मनसे राष्ट्रवादी यांनी सामंजस्याने काँग्रेसला चाल दिली. काँग्रेसकडून खैरे यांचा सभापतिपदासाठी, तर मनसेकडून उपसभापतिपदासाठी भामरे यांनी अर्ज केला. महिला बालकल्याणचे संख्याबळ नऊ असून, त्यात मनसे ३, राष्ट्रवादी तर काँग्रेस असे सहा संख्याबळ असल्यामुळे त्यांचाच विजय निश्चित हाेता. शिवसेनेकडून माकपमधून अालेल्या नंदिनी जाधव यांचा दाेन्ही पदांसाठी अर्ज हाेता. निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब बागडे यांच्या अध्यक्षतेत प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जाधव यांनी अर्ज मागे घेतला. परिणामी खैरे भामरे यांची अविराेध निवड झाली.

या वेळी स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, विराेधी पक्षनेता कविता कर्डक, सभागृहनेते सलीम शेख, मनसे महानगरप्रमुख राहुल ढिकले, गटनेता अनिल मटाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. दरम्यान, युती पुरस्कृत काेट्यातील सुनील वाघ हे अनुपस्थित हाेते. मात्र, संख्याबळ कमी असल्यामुळे त्याचा काेणताही परिणाम निवडणुकीवर झाला नाही.

काँग्रेसचे शहराध्यक्षपद शरद अाहेर यांच्याकडे असले तरी, प्रत्यक्षात पालिकेत मात्र बहुतांश निर्णय गटनेत्यांकडूनच घेतले जात असल्याचे चित्र हाेते. गटनेते उत्तम कांबळे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त असल्याने ते अनुपस्थित हाेते. दरम्यान, निवडणुकीनिमित्ताने काँग्रेसमधील अनेक जुने पदाधिकारी एकत्र अाल्याचे चित्र दिसले. अाहेर यांच्याबराेबर माजीमंत्री शाेभा बच्छाव, लक्ष्मण जायभावे, हेमलता पाटील, नरेश पाटील, अश्विनी बाेरस्ते अादींसह पदाधिकारी उपस्थित हाेते. खैरे यांच्या या निवडणुकीनिमित्त बऱ्याच दिवसांनी काँग्रेस पदाधिकारी एकत्रित जल्लाेष करत असल्याचे चित्र दिसून अाले.

सभापतिपदी निवड झाल्याबद्दल वत्सला खैरे यांचा सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब बागडे. समवेत उपायुक्त डी. टी. गाेतिसे, सहायक अायुक्त डाॅ. वसुधा कुरणावळ, रंजना भानसी, शीतल भामरे, मेघा साळवे, शाेभा अावारे, रत्नमाला राणे, रूपाली गावंड, नंदिनी जाधव अादी.