आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकल्याण विभागाने मागवली गॅसची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील अंगणवाड्यांना अवघा पन्नास पैसे इंधन भत्ता मिळत असल्याने सेविका आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील किती अंगणवाड्यांत गॅस कनेक्शन आहेत, याची माहिती उप मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मागितली आहे. पुढील बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे.
जिल्ह्यात हजार ८०० अंगणवाड्या असून त्यात बालकांना पुरक पोषण आहार दिला जातो. कुपोषण निर्मुलनाचे महत्त्वपूर्ण काम ही यंत्रणा प्रभावीपणे राबवत आहे. तथापि अंगणवाड्यांना मिळणारा निधी तुटपुंजा असल्याने सेविकांची आर्थिक कोंडी झाली आहे. आहार शिजवण्यासाठी सुमारे हजार २०० अंगणवाड्यांचा ठेका बचत गटांना दिला आहे. जिल्ह्यातील सुमारे ५०० अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु, हा आकडा आणखी कमी असण्याची शक्यता आहे. जेथे गॅस नाही, तेथील आहार शिजवण्यासाठी प्रतिबालक ५० पैसे इंधनभत्ता दिला जातो. या पैशात रॉकेलचा प्रश्न सुटत नसल्याने सेविकांना पदरमोड करून आहार शिजवावा लागतो.

या पार्श्वभूमीवर ससे यांनी जिल्ह्यातील गॅस कनेक्शन असलेल्या अंगणवाड्यांची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागितली आहे. २९ एप्रिलला होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे. गॅस कनेक्शन घेतल्यानंतर टाक्यांची सबसिडी वजा केले तरच गॅसचा प्रयोग यशस्वी होईल; अन्यथा सेविकांची आर्थिक पिळवणूक सुरूच राहील.