आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकच्या चिमुकल्यांना परदेशात घर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-जन्मत:च मातापित्याने दूर केल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य कोमजलेलं.. त्यातच शारीरिक व्याधीही जडल्याने वेदनांना पारावर उरला नाही.. अशा परिस्थितीत त्यांना आधार मिळण्याची अपेक्षा तरी कशी करणार? पण नाशिकच्या आधारार्शमातील तीन व्याधीग्रस्त अनाथ बालकांचं नशीब उजळलंय. यातील दोघांना स्पेनमधील दोन कुटुंबांनी, तर एकीला इटलीतील कुटुंबाने दत्तक घ्यायची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे यातील एक दीडवर्षीय चिमुकला येत्या मार्च अखेरपर्यंत स्पेनमध्ये रवानादेखील होणार आहे.
केअरिंग (चाइल्ड अँडोप्शन रिसोर्स इन्फर्मेशन अँण्ड गायडन्स सिस्टिम)ची तरतूद आल्यापासून भारतातून परदेशात शारीरिकदृष्ट्या अधू मुलं दत्तक जाण्याची ही पहिलीच घटना आहे. बालक दत्तक घेण्याविषयी पूर्वी फारशी जागृती नसल्यामुळे अनाथ बालकांना परदेशात दत्तक देण्याची पद्धत रूढ होती. परंतु, त्यातून अनेक अनिष्ट गोष्टी घडू लागल्या.
या पार्श्वभूमीवर 1984 पासून भारतातील बालके परदेशात देण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर भारतीयांमध्ये दत्तक घेण्याची वृत्ती वाढली; परंतु धडधाकट वा गोर्‍यागोमट्या मुलांनाच पसंती दर्शविली जाऊ लागल्याने शारीरिक आणि मानसिक व्यंग असणारी बालके वंचित राहू लागली. त्यांच्या नशिबी अनाथ असल्याचा शिक्का आयुष्यभरासाठी लागला गेला. ही बाब ओळखून दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल अँडॉप्शन रिसोर्स अँथॉरिटी’(कारा)ने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली.
त्यात अशा बालकांच्या काळजीच्या पद्धतीत बदल करून परदेशातील नागरिकांनाही ऑनलाइन पद्धतीने भारतातील मुले दत्तक घेण्याची मुभा दिली. त्यानुसार भारतात प्रथमच नाशकातील तीन बालके परदेशात दत्तक म्हणून जात आहेत. आधारार्शम व मुंबईतील बाल आशा ट्रस्ट या संस्थांनी संयुक्तपणे या बालकांच्या दत्तकविधानाचे पिटीशन हायकोर्टात दाखल केले आहे.