आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाभाळाच्या छताखालील शाेषित मुलांना सुरक्षा कवच, अवेक‌निंग जागृती संस्थेचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्त्यावरची मुले म्हटले की त्यांची देखरेख करणारे काेणीही नाही असे गृहित धरले जाते. त्यांना अापल्या हक्कांची माहिती नसल्याने त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जाताे. त्यांचे लैंगिक शाेषणही केले जाते. असे प्रकार वाढल्याने अवेकनिंग जागृती संस्थेच्या वतीने या मुलांना लैंगिक शाेषण म्हणजे काय, त्याच्यापासून बचाव कसा करावा याविषयीचे प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेण्यात अाले अाहे. लैंगिक शाेषणाला नकार कसा द्यावा, याचीही माहिती संस्थेतर्फे देण्यात येत अाहे. पुणे अाणि नाशिकमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात असून यापुढे मुंबई, अाैरंगाबादसह अन्य माेठ्या शहरांत ताे सुरू होणार अाहे.

सिग्नलवर गजरा वा खेळणी विकणारी बालके बघून प्रत्येकालाच त्यांची कणव येते. या मुलांच्या हालअपेष्टा बघून यांना काेठून पळवून तर अाणले नसेल ना असाही संशय व्यक्त हाेताे. सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्याच्या हातात पैसे टेकविणे किंवा हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही हाेत नाही. परंतु, या मुलांच्या खऱ्या समस्या काेणत्या अाहेत ते जाणून घेण्याचा मात्र काेणी फारसा प्रयत्न करीत नाही. गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या लैंगिक शाेषणाच्या प्रमाणात माेठी वाढ झाली अाहे. नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वीच रस्त्यावर राहणाऱ्या एका बालिकेवर बलात्कार केल्याची घटना घडली हाेती. या पार्श्वभूमीवर अवेकनिंग जागृती संस्थेतर्फे रस्त्यावरील मुलांमध्ये लैंगिक शाेषणाविषयी जागृती निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात अाले अाहे. त्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते या मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी मैत्री करत अाहेत. एकदा अाेळख झाली की, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, लैंगिक शाेषण म्हणजे काय, त्यापासून कसा बचाव करावा, शाेषण हाेत असेल तर काेणत्या संस्थेकडे धाव घ्यावी, जवळच्या पाेलिस स्टेशनशी कसा संपर्क साधावा, मुलांना मदत करणाऱ्या संस्था काेणत्या याची माहिती देत अाहेत. त्यासाठी पपेट शाे, माहितीपत्र, चित्रे या माध्यमांचा वापर करण्यात येत अाहे.

मुलांना शिकवताना संस्थेचे कार्यकर्ते.
रस्त्यावरील बालकांना वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात असला तरीही ते शाळेत जात नाहीत. त्यामुळे अवेकनिंग जागृतीने सिग्नलसह अन्य ठिकाणी अशा मुलांना संबंधित जागेवर केंद्र स्थापन करून शिक्षण देण्याचे काम सुरू केले अाहे. शिक्षणाची गाेडी निर्माण झाल्यावर त्यांना मनपा, जि. प. शाळांमध्ये प्रवेश मिळेल.

राेज दाेन तास शिक्षण
पुण्यात१००, तर नाशिकमध्ये १५० मुलांना अाम्ही दरराेज दाेन तास शिकवताे. नाशिकमध्ये रेल्वे स्टेशन, पाथर्डी फाटा, मुंबई नाका, गंगाघाट येथे तर पुण्यात सुसराेड, फुलेनगर, सांगवी येथे अामचे काॅन्टॅक्ट पाॅइंट अाहे. सकाळी ते सायंकाळी ५पर्यंत दिवस काळजी केंद्रही खुले असते. मिलिंद गुडदे , वरिष्ठ क्षेत्र समन्वयक, अवेकनिंग जागृती संस्था