आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनी अधिकाऱ्यांना कोंडले कार्यालयात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वसतिगृहातरिक्त जागा असून, विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. औरंगाबाद शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील गृहपालाची त्वरित बदली करावी, आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात मार्चमध्ये झालेल्या विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी भारतीय आदिवासी पँथर या विद्यार्थी संघटनेने आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. मात्र, येथे विद्यार्थ्यांच्या समस्यांची दखल घेतली गेल्याने आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त अशोक लोखंडे, उपायुक्त संदीप गोलाईत यांच्यासह २० कर्मचाऱ्यांना कोंडले.

औरंगाबाद विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्यांच्या विरोधात भारतीय आदिवासी पँथरचे अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियान या संघटनेच्या सहकार्याने बेमुदत आंदोलन केले. आंदोलनाचा गुरुवारी ११ वा दिवस असून, एकाही अधिकाऱ्याने सकारात्मक भूमिका घेतली नाही. दिवसेंदिवस मुली-मुलांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले होते. आदिवासी आयुक्त समस्या सोडविण्यासाठी कोणतीही दखल घेत नाहीत म्हणून संघटनेचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

गुरुवारी रात्री एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडून धरले. या वेळी मुली सर्वाधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. गत अकरा दिवसांपासून आमचा अभ्यास बुडाला. मात्र, या शासनाला कोणतीही काळजी नाही.

या वेळी प्रशांत बोडखे, बाबासाहेब साबळे, रामप्रसाद माघाडे, संदीप कोठुळे, भूषण पाडवी, देविका मरसकोल्हे, गीता पावरा, सुकन्या बोडखे आदी उपस्थित होते. औरंगाबाद विभागाच्या विद्यार्थ्यांना लकी जाधव, योगेश शेवरे, देवा वाटाणे, बबलू चव्हाण, मुनाफ तडवी, अशोक बागुल, गणपत पवार आदी उपस्थित होते.

काही देणे-घेणे नाही
आदिवासी आयुक्तांना विद्यार्थ्यांशी काही देणे-घेणे नाही. ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांची एकही समस्या सोडविली नसल्याने शुक्रवारपासून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या निवासस्थानी घंटानाद आणि थाळीनाद करणार आहोत. प्रशांत बोडखे, अध्यक्ष, भारतीय आदिवासी पँथर
बातम्या आणखी आहेत...