आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसुधारगृहाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न लागणार मार्गी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उंटवाडी भागातील बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहामधील अडचणींवर ‘डी. बी. स्टार’ने शनिवारी (दि. ८) प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या ठिकाणी पाहणी करत संपूर्ण समस्यांचा आढावा घेतला. तसेच यासंदर्भात महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्तांशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
शनिवारी (दि. ८) ‘डी. बी. स्टार’ने बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहामधील समस्यांवर प्रकाशझोत टाकला होता. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना विधीसंघर्षग्रस्त मुलांकडून होणारी मारहाण या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. ‘डी. बी. स्टार’च्या या वृत्ताची दखल घेत शनिवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., सरकारी वकील अजय मिसर, महिला बालकल्याण अधिकारी सुरेखा पाटील, बालकल्याण समिती सदस्य अश्विनी न्याहारकर, हेमा पटवर्धन बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहाचे सचिव चंदुलाल शाह यांनी या ठिकाणी पाहणी करत समस्यांचा आढावा घेतला. येथे घरातून पळून आलेल्या, हरवलेल्या, बालमजुरीतून सुटका झालेल्या, अनाथ, भीक मागताना पकडलेल्या मुलांचा समावेश काळजी संरक्षणाची आवश्यकता असणाऱ्या श्रेणीमध्ये केला जातो तर चोरी करताना पकडलेली, पाकीटमार, खुनाचे, बलात्काराचे आरोप असणाऱ्या मुलांचा समावेश विधीसंघर्ष श्रेणीमध्ये केला जातो. या दोन्ही श्रेणींतील मुलांना स्वतंत्र ठेवणे आवश्यक असताना येथे एकत्रच ठेवल्याचे पाहणीत समोर आले. तसेच येथील कर्मचाऱ्यांची मंजूर पदे रिक्त आहेत. समुपदेशक नाहीत. मुलांनी सुधारावे यासाठी खास व्यवस्था येथे नसल्याचे दिसून आले. 

सुरक्षारक्षक नेमण्याची कार्यवाही करणार 
यासर्व समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिल्यानंतर महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्तांची तातडीने संपर्क साधून यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. तसेच या ठिकाणी तत्काळ सुरक्षारक्षक नेमण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...