आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसुधारगृहाची तत्काळ हाेणार सुधारणा; जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीनंतर कृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना घेतले फैलावर 
कर्मचाऱ्यांची कमतरता, सुरक्षेचा प्रश्न, बालसुधारगृह आणि निरीक्षणगृह एकत्र असल्याने वाढलेली चिंता, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, पाेलिस बंदाेबस्त अशा एकूणच परिस्थितीची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ‘दिव्य मराठी’च्या शनिवारच्या (दि. ८) विशेष डी. बी. स्टारमध्ये उंटवाडीराेडवरील बालसुधारगृह अाणि निरीक्षणगृहाची गंभीर स्थिती अधाेेरेखित करण्यात अाली हाेती. याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ही प्रत्यक्ष पाहणी करून येथील बालकांशी अाणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. परिस्थितीबद्दल त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले. दरम्यान, या सुधारगृहाची परिस्थिती महिनाभरात सुधारण्यात येईल असे अाश्वासन त्यांनी यावेळी दिले. 
 
 
घरातूनपळून आलेली, हरवलेली, बालमजुरीतून सुटका झालेली, अनाथ, भीक मागताना पकडलेल्या मुलांचा समावेश ‘काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असणाऱ्या श्रेणी’मध्ये केला जातो. तर चोरी करताना पकडलेली, पाकीटमार, खुनाचे, बलात्काराचे आरोप असणाऱ्या मुलांचा समावेश विधिसंघर्ष श्रेणीमध्ये केला जातो. या दोन्ही मुलांना स्वतंत्र ठेवणे आवश्यक असताना उंटवाडी येथील बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहात मात्र त्यांना एकत्रच ठेवले जाते. तसेच या सर्व बालकांसाठी केवळ दोनच काळजीवाहक कार्यरत असल्याचे डी. बी. स्टारने उघडकीस अााणल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहाची पाहणी केली. याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. या ठिकाणी अनेक पदे रिक्त आहेत. समुपदेशक नाहीत. मुलांनी सुधारावे यासाठी कोणतीही खास व्यवस्था नाही. मुलांवर संस्कार व्हावेत, अशी व्यवस्था नसल्याची गंभीर बाबी पाहणीत समोर आली. यासंदर्भात तत्काळ काही निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

अधिक पोलिस नेमणुकीच्या सूचना 
जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. येथे केवळ तीन पाेलिस असून दिवसात दोन पोलिस कर्मचारी तर रात्री एक कर्मचारी या ठिकाणी असतात असे उत्तर मिळाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस हेडक्वार्टरला संपर्क साधून कर्मचारी वाढविण्याच्या सूचना दिल्या. 

विधिसंघर्षित मुलांशी बंद खाेलीत संवाद 
उंटवाडी येथील बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहातील विविध समस्यांसंदर्भात पाहाणीसाठी आलेले जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी असलेले विधिसंघर्षित मुलांच्या कक्षात केवळ सरकारी वकील अजय मिसर यांच्यासोबत तब्बल २० मिनिटे ‘वन टू वन’ चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी एकाही पदाधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांना या कक्षात प्रवेश दिला नाही. 

कर्मचारी पगारविनाच 
कर्मचाऱ्यांच्यामारहाणीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना एक-एक करून त्यांच्याकडून सर्व अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचीही माहिती दिली. तर या कर्मचाऱ्यांना आठवड्यात एकही सुटी नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावर ताेडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. 

रिक्त पदांचा प्रश्न राज्यभर 
^बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहातील रिक्तपदे भरली जात नाहीये. हा प्रश्न संपूर्ण राज्याचाच आहे. यामुळे संपूर्ण कामांचा भार तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व विषयांची माहिती दिली आहे. त्यांनी बालकल्याण अायुक्तांशी संवादही साधला अाहे. यावर लवकरच ताेडगा निघेल अशी अपेक्षा अाहे. सुरेखा पाटील, महिला बालकल्याण विकास अधिकारी 

महिनाभरात स्थिती बदलेल 
^बालसुधारगृहआणिनिरीक्षणगृहाची संपूर्ण पाहणी केली आहे. या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या जाणून घेतल्या. सर्वात मोठा प्रश्न हा कर्मचाऱ्यांची कमतरता हाच आहे. यासंदर्भात आयुक्तांशी बोलणे झाला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. महिनाभरात या ठिकाणांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. -राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी 
कर्मचाऱ्यांचीच कमतरता.. 

^आमच्याकडे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचाच माेठा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व समस्या मांडल्या आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहाची पाहणी करण्यात आली. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. यासाठी अाता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च पुढाकार घेतला अाहे. -चंदुलाल शाह, सचिव, बालसुधारगृह आणि निरीक्षणगृह 

सचिवांनाही केल्या सूचना 
बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहातील अडचणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही सचिवांची असून या सर्व प्रकरण जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सचिव चंदुलाल शाह यांना केल्या. तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण होणे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असून असे प्रकार घडल्यानंतर त्याची तत्काळ माहिती द्यावी, असेही ते म्हणाले. 

आयुक्तांशी साधला संपर्क 
बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहातील सर्वात मोठा प्रश्न हा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता हाच अाहे. हे लक्षात अाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आपला मोबाईल फोनवरून महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्त माळी यांच्याशी संपर्क साधला. या सर्व प्रकरणाची माहिती देत याठिकाणी लवकरच लवकर भरतीप्रक्रिया राबविण्याचे सूचना केले. अायुुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

महिन्यांपासून जामीन नाही 
ते महिन्यांपासून असलेल्या या मुलांचे जामीन अद्याप झाले नाही? त्यांच्या जामिनासाठी काय करता येईल? यासंदर्भात संस्थेच्या कायदेशीर सल्लागारांनी सरकारी वकील अजय मिसर यांच्यासोबत चर्चा करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. 

तत्काळ भरणार कंत्राटी कर्मचारी 
निरीक्षणगृहांत समुपदेशक, लिपिक, शिक्षक, काळजीवाहक, स्वयंपाकी, व्हीएमओ ही पदेे रिक्त आहेत. परिणामी, येथील मुलांसह कर्मचाऱ्यांना त्रास हाेत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही पदे कंट्राटी पद्धतीने भरण्याचे आश्वासनही दिले. 
 
या अाहेत समस्या 
निरीक्षणगृहांतपरिविक्षा अधिकारी हेच अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सर्व कामांचा भार हा संस्थेतील लिपिकावर येताे. 

संस्थेत दाखल असलेल्या सर्व मुलांसाठी रोज सकाळ-संध्याकाळ जेवण तयार करणे, मुलांसाठी सकाळी सहा वाजताच दूध गरम करणे नास्ता तयार करणे इ. कामे चुकता करावी लागतात. बहुतांश निरीक्षणगृहांत स्वयंपाक्यांची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...