आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालनाट्य स्पर्धेत नाशिक पिछाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य नाट्य स्पर्धा संपते अाणि बालनाट्य स्पर्धेला सुरुवात हाेते. यंदा मात्र नाशिक केंद्रावर बालनाट्य स्पर्धा अशीतशीच हाेणार असे चित्र अाहे. गेल्यावेळी ४४ नाटके नाशिक केंद्रावर सादर झाली असताना, यंदा फक्त १८ नाटकांची नाेंदणी झाली अाहे. त्यातूनही एक-दाेन संघ वगळण्याची शक्यता वर्तविण्यात येते अाहे. शासनाच्यासांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १४ राज्य बालनाट्य स्पर्धा हाेऊ घातली अाहे. मात्र हाैशी राज्यनाट्य स्पर्धेला जसा उत्साह हाेता तसा नक्कीच या स्पर्धेला दिसणार नाही अशी चिन्हे अाहेत. कारण यंदा नाशिक अाणि अहमदनगर जिल्हा मिळून नाशिक केंद्रावर फक्त १८ नाटकं सादर हाेणार अाहेत. गेल्यावर्षी हाच अाकडा ४४ हाेता. दिवसभरात दाेन नाटके गेल्यावर्षी सादर व्हायची. तुलनेने नाशिक विभागात असलेल्या जळगाव केंद्रावर मात्र २४ नाटकं सादर हाेणार असल्याने नाशिक केंद्रावर नाशिक-नगर मिळून १८ तर एकट्या जळगावकडे २४ हा अाकडा काही वेगळेच सांगताे अाहे. त्यामुळे यंदाची स्पर्धेला तसा फारसा उत्साह दिसणार नाही असेच चित्र अाहे.
शासनानेभत्ता का बंद केला : सहभागीविद्यार्थ्याला शासनाकडून प्रवास अाणि निवास भत्ता म्हणून प्रत्येकी ७५ रुपये मिळत असे. पण अाता शासनाने ताे बंद केला अाहे. त्यामागे असे कारण सांगितले जाते की, हे पैसे विद्यार्थ्यांना मिळतच नव्हते. हे पैसे एकतर शाळेत जमा हाेत किंवा मधल्या मध्ये त्या-त्या नाटकाची जबाबदारी घेतलेले खाऊन टाकत. हा भत्ता बंद केल्यानेमुळेच मग यंदा बालनाट्य स्पर्धेतील संख्या राेडावली अाहे.
शहरातील शाळांची पाठ
नाशिक शहरात महापालिकेच्या अाणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अाहेत. तसेच, खासगी शाळांचीही कमी नाही. याखेरीज अनेक नाट्यसंस्थाही कार्यरत अाहेत. असे असतानाही शहरातील केवळ बाेटावर माेजण्याइतक्याच शाळा यात सहभागी हाेतात. नाट्यसंस्था तर ढुंकूनही बघत नाहीत. नाशिकचे समन्वयक अनेक शाळांमध्ये किमान काही नाटके बघण्यासाठी तरी मुलांना नाट्यगृहात अाणा अशी विनंतीही करतात, पण शाळांची उदासीनता कायम असते. त्यामुळे या स्पर्धांना रसिकाश्रयच मिळत नाही.

अाकडा कमी हाेण्याची कारणे
सगळ्यातमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने बंद केलेला भत्ता. शासनाने नाटकात सहभागी विद्यार्थ्यांना मिळणारा प्रवास निवास भत्ताच बंद केला अाहे.
मुळातच संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून या स्पर्धेला विविध संघ, शाळा सहभाग घेत नाही. फक्त शहरातील संघांचा, शाळांचा सहभाग असताे.
नाशिक शहरातील महापालिका अाणि जिल्हा परिषदांच्या शाळांची या स्पर्धेकडे पूर्णत: पाठ असते, खरं तर स्पर्धा शासनाची म्हटल्यावर शासनाच्या शाळांची उत्सुकता असायला हवी. पण, अाजपर्यंत असे कधीच झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...