आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: पालिका रुग्णालयातील बालरुग्ण कक्ष अखेर उघडला, सुविधांची बाेंबच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील बालरुग्ण कक्षासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी नवजात बालकांसाठी खरेदी केलेल्या ८० लाख रुपयांच्या व्हेंटिलेटरसह डबल सरफेस फोटोथेरपी, पेडिलेट्रिक व्हेंटिलेटर या अत्याधुनिक यंंत्रणा विनावापर पडून असून, रुग्णालयातील बालकक्षाला सर्रास कुलूप लावण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी (दि. १२) प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांतील बालरुग्ण कक्ष उघडण्यात आले.
 
हे कक्ष उघडून रुग्ण दाखल करण्याची सुरुवात झाली तरी या ठिकाणी सुविधांची बोंबच अाहे. जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात ५५ बालरुग्णांचा मृत्यू झाल्याचेही घटना घडली आहे. या घटनेनंतर आराेग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी थेट नाशकात येऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केल्यानंतरही महापालिकेच्या रुग्णालयात मात्र या विषयासंदर्भात गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून आले. 

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बालरुग्ण कक्षासाठी लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेले पेडिलेट्रिक व्हेंटिलेटर, इन्क्युबेटर, डबल सरफेस फोटोथेरपी यंत्रणेसह बालरुग्णांसाठी खरेदी केलेले अत्याधुनिक लाखो रुपयांची यंत्रणा गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात पडून आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या या रुग्णालयातील बालरुग्ण कक्षालाही कुलूप लावून ठेवण्यात आल्याचे असल्याचे ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर मंगळवारी (दि. १२) पालिकेच्या रुग्णालयातील बालरुग्ण कक्ष उघडण्यात आले. तसेच या कक्षात रुग्णही दाखल करून घेण्यात आले. मात्र, या कक्षासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची अद्याप नियुक्ती झाल्याने या कक्ष नेमकी किती दिवस चालू राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज.. 
डॉ.झाकीरहुसेन रुग्णालयातून दररोज शेकडो रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात. बालरुग्ण तर रुग्णालयात दाखलही करून घेतले जात नाही. या ठिकाणी डॉक्टर्स कर्मचारी नसल्याचे सांगत येथे उपचार होणार नाही असे सांगितले जाते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. 
- युसूफ शेख, नागरिक 
बातम्या आणखी आहेत...