आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन; सहजयोग परिवारातर्फे अनोखा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीय संस्कृती व परंपरांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने सहजयोग परिवारातर्फे चीनमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चीनमधील दहा शहरांमध्ये हा सांस्कृतिक महोत्सव होणार असल्याने भारतीय संस्कृतीचे दर्शन आता सातासमुद्रापार घडणार आहे. सहजयोग परिवाराचे सदस्य संपूर्ण जगात विखुरलेले आहेत. चीनमधील सहजयोग परिवाराने भारतातील परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडावे, यासाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी नाशिकमधील नृत्यांगना पल्लवी चौरे हिची निवड करण्यात आली होती. पल्लवी चौरे ही भरतनाट्यम् या नृत्यप्रकार सादर करणार आहे.

भारतीय संस्कृतीतील सांस्कृतिक परंपरेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने सहजयोग परिवारातर्फे चीनमधील दहा प्रमुख शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवात देशातून सहजयोग परिवारातील नाशिकची पल्लवी चौरे हिची निवड झाली असून ती भरतनाट्यम् हा नृत्य प्रकार सादर करणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवासाठी पल्लवीसह संदीप दलाल, मिलिंद दलाल (नागपूर), रिना टिपर्स (मुंबई), निशिकांत पाठक (लातूर) आदी सदस्य चीनला गेले आहे. या महोत्सवात भारतासह ऑस्ट्रेलिया व आफ्रिका या देशांचे कलावंतही सहभागी होणार आहेत.

या शहरांत सादरीकरण
भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी हा सांस्कृतिक महोत्सव होणार असून, चीनमधील बीजिंग, शांघाई, शेजान, हुजान, सूजू, तान्जी, बायसिकुट या प्रमुख शहरांसह एकूण दहा शहरांमध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.