आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या गौरींसमोर नतमस्तक चिनी अधिकारी, राजेश सावंत यांनी चीनमध्‍ये केली प्रतिष्ठापना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारत आणि चीनमधील वाढता तणाव कमी करून संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी दाेन्ही देशांकडून प्रयत्न सुरू असताना या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी काही भारतीय नागरिकही पुढे अाले अाहे. एका बड्या कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले राजेश सावंत यांनी चीनमधील नाज्नींग शहरात गाैरी गणपतीची पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे प्रतिष्ठापना केली.
 
इतकेच नाही तर गाैरींच्या दर्शनासाठी त्यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांना निमंत्रितही केले. गाैरीचे माेहक रूप अाणि या प्रथेची महती एेकून चीनमधील अधिकारीही गाैरींसमाेर नतमस्तक झाले. चीनच्या महिलांनाही गाैरीचे अप्रुप हाेते. इतकेच नाही तर यापुढे प्रत्येक सण एकत्रितपणे साजरा करण्याचा संकल्पही येथील अधिकाऱ्यांनी गाैरी गणपतीसमाेर साेडला. भारतीय सण अाणि परंपरांचा डंका परदेशातही वाजत असल्याची उदाहरणे अनेक अाहेत. परंतु, मराठमाेळ्या गाैरींचेदेखील परदेशात अागमन हाेते तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येकाचाच ऊर भरून येताे. 

अशाच प्रकारे चीनमधील साळवे यांच्या निवासस्थानी यंदा प्रथमच ज्येष्ठा-कनिष्ठा अर्थातच गौरींचे आगमन झाले. धुळे जिल्ह्यातील लामकानी गावातील मूळ रहिवासी राजेश साळवे यांचे निवासस्थान नाशिकमध्ये अाहे. ते चीनमधील फाेर्ड कंपनीत कार्यरत असून, त्यांनी यंदा प्रथमच तेथे गाैरींची प्रतिष्ठापना केली. हा सण महाराष्ट्रातच साजरा हाेत असला तरीही नाज्नींग शहरात साळवे यांच्या अाजूबाजूला राहणारे दक्षिण भारतीयांनीदेखील गाैरींच्या स्वागताची जय्यत तयारी केली हाेती. तेथे राहणारे भारतीय अापापल्या मूळ प्रांतातील सण अशाच पद्धतीने एकत्र येऊन साजरे करतात. गाैरीच्या सणाला मात्र भारतीयांबराेबर चिनी अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. 

हरखले अधिकारी 
गाैरीचे देखणे रूप बघून चिनी अधिकारी हरखून गेले हाेते. विशेषत: चिनी महिलावर्ग गाैरीचा
साजशृंगारावर चर्चा करताना दिसत हाेते. इतकेच नाही तर अनेक महिलांनी चीनमध्येही असा सण साजरा व्हायला हवा हाेता, अशी इच्छा व्यक्त केली. ज्येष्ठा अाणि कनिष्ठांची कथा एेकून एका चिनी अधिकाऱ्याने ती अक्षरश: अापल्या डायरीत लिहून घेतली. भाेजनाचा अास्वादही या चिनी मंडळींनी मनसाेक्तपणे घेतला. काहींनी हातानेही खाण्याचा प्रयत्न केल्याचे साळवे यांनी सांगितले. 
 
गाैरींच्या दर्शनासाठी चिनी अधिकारी अाल्याने ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ची अनुभूती अाम्हाला अाली. चीनच्या महिलावर्गाला गाैरींचे अप्रुप हाेते हे लक्षात अाले. सर्वांनीच अामच्या गाैरींबराेबर सेल्फी काढला. 
- राेहिणी साळवे 
 
भारत अाणिचीनचे संबंध अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून सुधारू शकतात. अर्थात चीनमधील नागरिक अतिशय समंजस अाहेत. परदेशातील प्रत्येक नागरिकाला ते वेळाेवेळी मदत करीत असतात. 
- राजेश साळवे 
बातम्या आणखी आहेत...