आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात चिनी महिलेचा विनयभंग करून लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एका व्यावसायिक तरुणासह त्याच्या चिनी नागरिक असलेल्या पत्नीचा विनयभंग करीत मारहाण करून दागिने लूटल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.


नाशिकरोड येथील व्यापारी अनुपम महेश्वर अतकरे हे पत्नीसह मुंबईहून नाशिककडे झायलो गाडीने येत होते. महामार्गावर त्यांच्या वाहनाला हुंदाई कारने मागून धडक दिली. त्यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघातानंतर अनुपम यांनी तडजोडीने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित कारचालकाने तुमच्या वाहनातून आम्हाला पुढे घेऊन जा, अशी मागणी केली. त्यावर अनुपम यांनी अपघात झाल्याने वाहन पुढे घेणे शक्य नसल्याचे सांगत तुम्ही जा, असे समजावले. मात्र कारचालकाने अनुपम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची चिनी रहिवासी असलेली पत्नी वाद सोडविण्यास गेल्या कारचालक व त्याच्या सहका-यांनी त्यांनाही मारहाण करत अश्लील वर्तन केले. तसेच त्यांचा सोन्याचा गोफ, नेकलेस, सोने व हि-याची अंगठी असा ऐवज लुटून नेण्यात आल्याचेही अतकरे दांपत्याने फिर्यादीत म्हटले आहे.


आरोपी निफाडचे
आरोपींच्या वाहन क्रमांकावरून माहिती घेतली असता संशयित आरोपी हे निफाड तालुक्यातील सायखेडा येथील असल्याचे निष्पन्न झाले. हुंदाई कार ही प्रशांत रवींद्र देहाती यांची आहे. संशयितांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी पी. व्ही. चौधरी यांनी दिली.