आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशत ; बिबट्याच्या संचाराने थरकाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - इंदिरानगर येथील शास्त्रीनगरमधील गजानन महाराज मंदिर परिसरात रविवारी सकाळी व रात्री बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये दिवसभर दहशतीचे वातावरण होते. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास वन खात्याच्या कर्मचा-यांना एका बंद बंगल्याच्या आवारात बिबट्या दिसल्याने त्याला पकडण्याची तयारी सुरू करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा नेमका ठावठिकाणा समजू शकला नाही.
सर्वप्रथम सकाळी 7 वाजेच्या सुमारास रामेश्वर बिल्डिंगवरून हा बिबट्या प्रथमेश बंगल्याच्या भिंतीवर उडी मारताना सुरक्षारक्षक अरुण अमृतकर यांनी पाहिला. त्यानंतर त्याने झेप घेत रस्त्यावर उडी मारली. रस्त्याने जाणा-यारूपाली टांकसाळे यांच्या स्कूटीवरून उडी मारून अनंतकृपा बंगल्याकडे तो गेल्याचे अनेक नागरिकांनी बघितले. ते बछडे असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने या बिबट्याने कोणालाही जखमी केले नाही. केवळ रस्ता चुकल्यामुळे तो इकडे-तिकडे वाट शोधत होता. रात्री पुन्हा तो दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. वनविभागाचे अधिकारी राजन गायकवाड, एस. एस. गोसावी, के. जे. कदम, दिलीप झगडे यांच्यासह संपूर्ण पथकाने घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. इंदिरानगर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
प्रत्यक्षदर्शी म्हणतात...
बिबट्याला झेप घेताना पाहिले
- सकाळी बंगल्याच्या भिंतीवरून बिबट्याने झेप घेतली व तो पळत सुटला. कुत्र्याएवढी त्याची उंची होती. - अरुण अमृतकर, सुरक्षारक्षक
गाडीवरून उडी मारली
- बिबट्याने माझ्या स्कूटीवर उडी मारल्याने मी खूप घाबरले. तो क्षण आठवताच अंगावर काटे उभे राहतात. - रूपाली टांकसाळे, महिला
अधिकारी, लोकप्रतिनिधी म्हणतात.
घटनास्थळाची पाहणी केली
- या ठिकाणी आम्ही पाहणी केली. मात्र, मातीचा रस्ता नसल्यामुळे बिबट्याचे ठसे घेण्यात अडचणी आल्या. या ठिकाणी एक पथक लक्ष ठेवून आहे. - एस. एस. गोसावी, वनपाल
नागरिकांनी सतर्क राहावे
- अनेकांनी बिबट्याला पाहिल्याने तो याच परिसरात असावा. त्यामुळे लहान मुलांना जपावे. नागरिकांनी पोलिस किंवा वनविभागावर अवलंबून न राहता स्वत: सतर्क राहावे. - वसंत गिते, आमदार