आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रनगरी फाळके स्मारकातच, मुंबईच्या चित्रनगरीकडून संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फाळके स्मारकात चित्रनगरी उभारायची की इगतपुरीत या वादाला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. दादासाहेब फाळके स्मारकातच चित्रनगरी उभारण्याचे सकारात्मक संकेत मुंबईच्या चित्रनगरीकडून मिळाले असल्याची माहिती चित्रपट महामंडळाचे नाशिक विभागाचे समन्वयक अरुण रहाणे यांनी दिली.

आठवड्याभरापूर्वी रहाणे यांनी पाठपुराव्यासाठी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीचे उपाध्यक्ष मंगेश मोहिते यांच्याबरोबर बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनुसार मनपाची फाळके स्मारकासारखी जागा असताना तसेच प्राथमिक सुविधा उपलब्ध असताना फाळके स्मारकातच चित्रनगरी उभारणे सोपे व सोयीचे होईल असा निष्कर्ष निघाला असून, त्यावर पदाधिकार्‍यांचा विचार चालू आहे.

नाशिकच्या निर्मात्यांसह कलाकारांसाठी पूरक
नाशिकचे कलाकार अभिनयासह चित्रपट निर्मितीतही कार्यरत आहेत. अद्ययावत चित्रनगरी उभारल्यास स्थानिक कलाकार व निर्मात्यांना फायदा होईल. मुंबईच्या कलाकारांनाही नवीन लोकेशनचा वेगळा पर्याय मिळेल, असे मत चित्रपट महामंडळातर्फे मांडण्यात आले.

सर्वंकष विकास
हा प्रस्ताव मंजुरीची शक्यता आहे. तसे झाल्यास कोल्हापूर येथे जे काम उभारले जाते आहे, त्यासाठी लागणार्‍या निधीतील काही वाटा नाशिकच्या पदरात पडेल. शहराचाही या क्षेत्रात सर्वंकष विकास होईल. अरुण रहाणे, समन्वयक, चित्रपट महामंडळ