आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमातील चॉकलेटची गोष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आज चॉकलेट डे व्हॅलेंटाइन वीकमधील सगळ्यांचा विशेषत: तरुणींचा आवडता तिसरा दिवस म्हणजे ‘चॉकलेट डे’. पहिल्या दिवशी गुलाब देऊन आवड व्यक्त करायची, दुसर्‍या दिवशी प्रत्यक्षात प्रपोज आणि तिसर्‍या दिवशी अर्थात ‘चॉकलेट डे’च्या दिवशी होकार-नकाराची वाट बघायची. म्हणजे होकार असेल तर तोंड गोड करायचे आणि नकार असेल तरीही वाईट वाटू न देता चॉकलेट्स खाऊन मैत्री मात्र कायम ठेवायची, असे त्यामागील बॉण्डिंग असते. याच वीकमध्ये मैत्रीत आलेला दुरावा दूर करण्यासाठीही तोंड गोड करून ‘चॉकलेट डे’ साजरा केला जातो. सध्या मिळणार्‍या विविध प्रकारच्या चॉकलेट्समुळे दिवसेंदिवस या डेची धम्माल अधिकच रंगत आहे.

व्हॅलेंटाइन वीकमधील दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘प्रपोज डे’. शहरात विशेषत: कॉलेजियन्समध्ये ‘प्रपोज डे’ काहीशा धाकधुकीत पण उत्साहात साजरा झाला. काहींच्या सादेला प्रतिसाद मिळाला, तर काहींच्या नशिबी ‘वेट अँण्ड वॉच’ ही स्थिती आली.

गिफ्ट द्या चॉकलेट बुके
प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट देण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. जोडीदाराला भेटवस्तू म्हणून चॉकलेट देतात. ‘चॉकलेट डे’साठी यंदा बाजारात विविध प्रकारची चॉकलेट्स आली आहेत. तसेच नवीन स्टाइल घेऊन चॉकलेट बुके बाजारात उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या रॅपरमध्ये चॉकलेट पॅक करून त्याला फुलांच्या बुकेप्रमाणे सजवले जाते व चॉकलेट बुके तयार केला जातो. चॉकलेट बुके आकर्षक पॅकमध्ये 500 ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या दरात बाजारात उपलब्ध आहेत.