आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटा रद्द; सीअायडीकडून जळगाव जिल्ह्यात आढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हजार अाणि पाचशेच्या नाेटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाबाबत जनमानसावर झालेल्या परिणामांचा अाढावा राज्य गुप्तचर विभाग (सीअायडी) अाणि इंटेलिजन्स ब्यूराे (अायबी)कडून घेण्यात अाला. याबाबतचा अहवाल पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात येणार अाहे.

नोटा रद्दच्या निर्णयानंतर झालेल्या परिणामांबाबत आढावा घेण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयातर्फे सीआयडी आयबी या यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सीआयडी आयबीच्या अधिकाऱ्यांकडून हजार, पाचशेच्या नोटा रद्दच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील बंॅकांमध्ये असलेली परिस्थिती, बाजारपेठेवर झालेला परिणाम, सहकारी बंॅकांवर झालेला परिणाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी, नोकरदार, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्यांवर झालेल्या परिणामांबाबत सीआयडी आयबीच्या अधिकाऱ्यांकडून पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालय, आयकर विभाग, जिल्हा उपनिबंधक, खासगी बंॅकांचे अधिकारी आदी ४५ प्रकारच्या विविध शासकीय निमशासकीय खासगी यंत्रणांकडून माहिती घेण्यात येत आहे. त्याबाबतचा अहवाल पंतप्रधान कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.
जनसामान्यांवर परिणाम
हजार पाचशेच्या नोटा रद्दच्या निर्णयानंतर बंॅकांमध्ये चलन नाही; सहकारी बंॅका कोलमडल्या आहेत. बाजारपेठेवरही नाेटा बाद करण्याच्या निर्णयाचा परिणाम झाला आहे. भाजीपाला नाशवंत वस्तूविक्री व्यवहाराला त्याचा सर्वाधिक फटका बसला. एकंदरीत, हा निर्णय हाेऊन महिना हाेत अाला असला तरी परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही, असा अहवाल सीअायडी अाणि अायबीने तयार केल्याची माहिती मिळाली.
बातम्या आणखी आहेत...