आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत कारची तोडफोड, भयभीत नागरिकांनी केली कडक कारवाईची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- सिडकाेच्या पवननगर परिसरातील शहीद भगतसिंग चौकात शनिवारी (िद. ११) पहाटे सराईत गुंडांनी दहशत पसरवित चारचाकी वाहनांच्या काचा फोडून तेथीलच एका दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. नवीन पाेलिस अायुक्त िनयुक्तीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांनी पाेलिस यंत्रणेलाच अाव्हान देण्याचा प्रयत्न यातून केल्याचे मानले जात अाहे. या प्रकाराने नागरिक भयभीत झाले असून, या गुंडांविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शनिवारी पहाटे वाजेच्या सुमारास दगड दंडुक्यांच्या साहाय्याने एका स्विफ्ट कारच्या (एम.एच. १५ डी.एस. १११४) काचा फोडण्यात आल्या. त्यावरच थांबता गुंडांनी एका सलूनचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते फरार झाले. या प्रकरणी कारमालक योगेश पाटील यांच्या तक्रारीवरून संशयित गणेश शिंगोटे प्रेम साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शिंगोटे त्याच्या साथीदारांविरोधात गणेश पवार सुनील कुमावत या नागरिकांनीही यापूर्वी पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. नागरिकांना धमकावणे, वाहनांचे नुकसान करणे, दहशत माजविणे असे प्रकार केल्याच्या या तक्रारी अाहेत. मात्र, काेणतीही कारवाई झाल्यामुळे त्यांची हिंमत वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अंबड पोलिस तपास करीत आहेत.
टिप्परगँग पुन्हा सक्रिय : काहीदिवसांपूर्वी सिडकोतील टिप्पर गँगने परिसरात प्रचंड दहशत माजविली होती. त्यातील म्होरक्यांना ‘मोक्का’ लागल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, सध्या त्यांच्यातीलच काही गुंड पुन्हा डोके वर काढीत सिडकोतील अनेक भागात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. उपेंद्रनगर भागात एका उद्यानात रात्रीच्या वेळी मद्याच्या पार्ट्या, तसेच राजरत्ननगर भागात नागरिकांना धमकाविणे, वाहनाचे नुकसान करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यांच्यावर पुन्हा कारवाईची वेळ आली असून, वेळीच आवर घातल्यास पोलिसांपुढे माेठे आव्हान उभे राहील, असे रहिवाशांनी बाेलून दाखवले.
संशयित ताब्यात घेतले, कारवाई करीत आहोत-
याघटनेतील संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाईल. अंबड पाेिलसांतर्फे अधिक तपास केला जात आहे. दिनेशबर्डेकर, वरिष्ठनिरीक्षक, अंबड
यापूर्वीही केले आहे वाहनांचे नुकसान
यागुंडांनी यापूर्वीही या भागात वाहनांचे नुकसान केले आहे. त्यांना राेखणाऱ्या नागरिकांनाच पुन्हा धमकाविले जाते. मी बाहेरगावी गेलो असताना माझी कार फोडली. योगेशपाटील, तक्रारदार