आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत 136 धोकादायक घरांना नोटिसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - सिडकोतील 136 धोकादायक घरांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. नागरिकांना स्वत:हून निवा-याची जागा बदलण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागासह पूररेषेत येणारी घरे व व नागरी वसाहतीतीलही काही घरांचा त्यात समावेश आहे.


मोरवाडी, कामटवाडे, अंबड, पाथर्डी, दाढेगाव येथील 48, पूररेषेत येणारे नासर्डीलगतचे शाहूनगर, यमुनानगर, बरूबाबानगर, गोविंदनगर आदी ठिकाणची 46, शिवशक्तीनगर नाल्यालगतची 15 आणि वालदेवीलगत पिंपळगाव खांब, वडनेरदुमाला आदी भागातील 27 घरांना नोटीस देण्यात आल्या आहेत.


सुरक्षित स्थळी जा
पावसाळ्यात अनेक घरांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन पूर्वसूचित केले आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करीत धोकादायक घरातून स्थलांतरित होऊन सुरक्षित स्थळी जावे.
ए. पी. वाघ, विभागीय अधिकारी, सिडको