आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको सभापतींनी केला खुर्चीचा त्याग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- सिडको प्रभागातील आरोग्य विभागाच्या कर्मचायांची संख्या वाढवावी, या मागणीसाठी सिडकोचे सभापती उत्तम दोंदे यांनी सभापतिपदाच्या खुर्चीवर न बसण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील अस्वच्छतेच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, कर्मचारी संख्या कमी असल्याने समस्या सुटत नसल्यामुळे कर्मचारी संख्या वाढवावी, यासाठी गांधीगिरी मार्गाने सभापतींनी हे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिडको भागात 11 प्रभाग येतात. या संपूर्ण प्रभागांची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाख आहे. या लोकसंख्येसाठी 900 ते 1000 कर्मचारी संख्येची गरज आहे. मात्र, येथे फक्त 117 कर्मचारी आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरल्याचे दिसून येत आहे. वारंवार वाढीव कर्मचायांची मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने दोंदे यांनी माजी सभापती बळीराम (मामा) ठाकरे यांच्याशी चर्चा करीत दुसया खुर्चीवर बसून कामकाज केले. सिडको भागात आरोग्य विभागात कर्मचायांची भरती करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यांचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत सभापतिपदाच्या खुर्चीत बसणार नाही.
उत्तम दोंदे, सभापती, सिडको