आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cilantro Judi Rs 200, Prize Incise On Vegetable, Divya Marathi

कोथिंबीरची जुडी 200 रुपयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाची संततधार कायम राहिल्याने मंगळवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबीरच्या जुडीला तब्बल 200 रुपयांचा भाव मिळाला. सिन्नर तालुक्यातील दापूर येथील शेतकरी बाळासाहेब आव्हाड यांनी कोथिंबीरच्या बाराशे जुड्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या. आडतदार रंजन शिंदे यांच्या न्यू जय बजरंग व्हेजिटेबल कंपनीतून व्यापारी प्रल्हाद आंधळे यांनी ही कोथिंबीर 19 हजार 200 रुपये शेकडा भावाने खरेदी केली.
विशेष म्हणजे, सोमवारी कोथिंबीर आठ रुपये जुडी, तर रविवारी अवघी तीन रुपये जुडी असा भाव होता. जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी पडलेल्या पावसामुळे आवक कमी झाली असल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.