आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबारातील जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवटी महाविद्यालयासमोर झालेल्या गोळीबारातील जखमी राहुल टाक या युवकाचा अाडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी मध्यरात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित युवकांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संशयित फरार असून, पोलिस पथकाकडून शोध सुरू आहे.

पंचवटी महाविद्यालयासमोर ही घटना घडली होती. राहुल टाक याच्या डोक्यात गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी रोहन शिंदेच्या फिर्यादीनुसार संशयित सुशांत वाबळे, अमोल पाटील, राहुल कदम, मनोज पवार, किरण पवार त्याच्या इतर साथीदारांनी गल्लीतील मुलीशी असलेल्या प्रेमप्रकरणावरून झालेले जुने भांडण मिटवण्यासाठी अमित देसले, इस्माइल शेख, राहुल टाक, सनी पाटील, रिझवान शेख, राहुल मोरे यांना पंचवटी महाविद्यालयासमोर बोलावले होते. संशयित या सर्वांना मारहाण करत असताना संशयित वाबळेने गावठी कट्टा रोहन शिंदेवर रोखला, शिंदे झटापट करत असताना वाबळेला धक्का दिल्याने पाठीमागे उभा असलेल्या राहुलच्या डोक्यात गोळी शिरली. संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर मित्रांनी राहुलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास अाडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता राहुलचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...