आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ दिवसांत ३६६ मुलांशी संपर्क, सिटिझन कँपेन देणार वंचित बालकांना शिक्षणाचा हक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिटिझन कँपेनद्वारे ४-७ वयोगटातील वंचित बालकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी शहरवासीय सरसावले असून, १५ दिवसांतच ३६६ मुलांशी संपर्क साधण्यात आला. जून रोजी पालिका शाळांमध्ये या कँपेनद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने कँपेनमध्ये रविवारी प्रत्यक्ष भाग घेतला.
पाणी आल्यावर आईला मदत करणाऱ्या मुली, तर काही मुले खेळण्यात मग्न, तर उन्हापासून बचाव करण्यासाठी सकाळी लवकर कामावरून थकून आलेले पालक उकाड्यात वामकुक्षी घेत होते. मात्र, उन्हाची पर्वा करता प्रत्येक घरात जाऊन ‘तुमचा मुलगा वा मुलगी शाळेत जाते का? त्याचे वय किती? त्यांना शाळेत पाठवा, त्यांना प्रवेश आम्ही मिळवून देतो, मुलांच्या भविष्याचा विचार करा, त्यांची प्रगती झाली तर तुमची प्रगती होईल’ असे आवाहन करण्यात आले.
‘चाकं शिक्षणाची’ संस्थेसह राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, कामगार विभाग आणि पालिकेतर्फे ‘एव्हरी चाइल्ड काउंट्स सिटिझन’ हा उपक्रम शिक्षण कार्यकर्ता सचिन जोशी यांनी हाती घेतला. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन युवा-युवती, नोकरदार आणि लोकप्रतिनिधींनी ट्रॅफिक सिग्नल, उड्डाण पुलाखाली, झोपडपट्टी आणि घरकामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची चौकशी करून ते वयोगटातील बालकांची माहिती देऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी पुढाकार घेतला. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या फुलेनगर, श्रीरामनगर, अंबिकानगर, वज्रेश्वरी, म्हसरूळ, पेठरोडवरील दत्तमंदिर, पंचवटी स्टेट बँकेमागे, विजयनगर, लेखानगर, खुटवडनगर, अंबड, गौतमनगर, शांतीनगर, पांडवनगरी, राजीवनगर, शिवाजीवाडी, भारतनगर, वडाळागाव, गंगाघाट परिसरात बालके आणि पालकांचे समुपदेशन करून २४ मे पर्यंत ३६६ बालकांचा पालिका शाळेत प्रवेश केला जाईल. कँपेन समन्वयक हेमंत भामरे, साधना पवार, शिवसेनेच्या अनिता पाटील, बबिता काळे, पप्पू मोरे, पप्पू काळे यांनी गरवारे पॉइंट परिसरातील गौतमनगर आणि साठेनगर येथील बालकांची चौकशी करून पालिका शाळेत प्रवेश देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कॉल केला अन् मदत मिळाली
इंदिरानगर पोलिस ठाणे इमारतीचे वाॅचमन म्हणून काम करणारे माणिक उफाळे बांधकाम मजूर असताना एके दिवशी पाचव्या मजल्यावरून पडले. त्यात त्यांचा पाय जायबंदी झाला. मुलीला शिकविण्याची त्यांची इच्छा आहे. पत्नी सायली धुणीभांडी करते. मात्र तेवढ्याने घर भागत नाही. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी ८९८३३३५५५५ला कॉल केला असता संबंधितांनी त्वरित जाऊन मुलीला शिक्षणासाठी मदत केली.
यामध्येच मिळत आहे खरा आनंद
- मी झोपडपट्टीत राहते. मात्र, मला सामाजिक कार्याची आवड आहे. संस्थेचे प्रतिनिधी आल्यानंतर दोन दिवस रजा घेऊन सर्व मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी माहिती घेत आहे. यामध्येच खरा आनंद मिळत आहे.
- बबिता काळे
शिक्षण देण्यासारखे पुण्य नाही
- मी‘दिव्य मराठी’ वृत्तपत्रात सिटिझन कँपेनबाबत वाचले. मोबाइलवर संपर्क साधून उपक्रमात सहभागाची इच्छा दर्शविली. वंचित बालकांना शिक्षण देण्याचे कार्य माझ्याकडून होत असल्याने यासारखे दुसरे पुण्य नाही.
- अनिता पाटील
पुढील स्लाइडसवर क्लिक करून वाचा, बालकांचा शोध, विशेष बालकांचीही सोय...
बातम्या आणखी आहेत...