आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizen Criticized On Nashik Municipal Corporation For Un Development

महापालिकेपेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी!, ग्रामस्थांची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिका क्षेत्रात समाविष्ट होऊन वीस वर्षे उलटली तरीही विकासाची गंगा कोसो दूर राहिल्याने शहरातील खेडे म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव या गावांमध्ये अनेक समस्यांचा डोंगर कायम आहे, अशी खंत ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे आपली ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

महापालिका क्षेत्रात समाविष्ट होण्याला तत्कालीन ग्रामपंचायती अन् ग्रामस्थांनी केलेला विरोध किती योग्य होता, हे सद्यस्थितीवरून लक्षात येते. या गावांमधील ग्रामस्थांनी विकास आराखड्याला तीव्र विरोध करीत सुरू केलेला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, राजकारणी आणि बिल्डरांच्या संगनमतातून आरक्षणे टाकून शेती संपविण्याचा घाट घालत असल्याने पालिकेपेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

अनुकूल हवामान, शेतीला बहर :
वालदेवी नदी, प्रदूषणविरहित हवामान, अशा अनेक अनुकूल घटकांमुळे वालदेवी नदीलगतच्या गावांमध्ये द्राक्ष शेती बहरली आहे. भाजीपाला उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकर्‍यांना सुगीचे दिवस आले असतानाच विकास आराखड्याच्या निमित्ताने शेतकर्‍यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

शहरालगतही हवी शेती : एका बाजूने लष्कराने जागा संपादित केल्याने त्यापुढेही विस्तार होण्यास र्मयादा आहेत. त्यामुळे पालिकेने विकास आराखडा तयार करताना पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव या गावांतील शेती कायम ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे शहरवासीयांना ताजा भाजीपाला उपलब्ध होऊ शकेल.