आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक-पोलिसांच्या प्रेमपूर्ण संबंधामुळेच कुंभमेळा यशस्वी, भीष्मराज बाम यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकमध्ये गेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे यंदाच्या कुंभपर्वात पाेलिस प्रशासनावर माेठा मानसिक तणाव हाेता. पण, अशा स्थितीतही पोलिसांनी सूक्ष्म नियोजनाद्वारे हा कुंभपर्व यशस्वी केला. नागरिकांशी सौजन्याने वागणे, प्रेमपूर्ण संबंध ठेवणे, मदतीसाठी तत्काळ धावून येणे, यामुळे हे शक्य झाल्याचे प्रतिपादन माजी पोलिस महासंचालक, क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी केले.

सन्मित्र पोलिस-नागरिक मित्र फाउंडेशन, लायन्स क्लब आॅफ नाशिक आणि जे. एम. सी. टी. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी परशुराम सायखेडकर सभागृहात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सन्मित्र सत्कार सोहळ्यात ते बाेलत हाेते. व्यासपीठावर शहर-ए-खतीब हाजी हिसामुद्दीन खतीब, जेएमसीटी पॉलिटेक्निकचे अध्यक्ष रऊफ पटेल, सन्मित्र पोलिस नागरिक मित्र फाउंडेशनचे प्रशांत जुन्नरे, लायन्य क्लब आॅफ नाशिकचे भाऊ सोनवणे, प्रकाश पाटील, दिवाकर रत्नपारखी उपस्थित होते.
या वेळी बाम यांनी परिस्थिती नियंत्रणासाठी बळाचा नव्हे, तर चांगल्या तसेच मैत्रीपूर्ण संबंधाचा अधिक उपयाेग केल्यास फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. यानंतर शहर-ए-खतीब हाजी हिसामुद्दीन खतीब यांनी नाशिककरांना भयमुक्त करणाऱ्या पोलिसांचे आभार मानले. सत्काराला उत्तर देताना पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाल्याचे सांगितले. कार्यक्रमास पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, अधिकारी, तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांचा झाला सत्कार
कुंभमेळा यशस्वी करणाऱ्या पोलिस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, एन. अंबिका, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर, अतुल झेंडे, राजू भुजबळ, विजय चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नम्रता देसाई, अशोक भगत, राजेश आखाडे, नारायण न्याहाळदे, मधुकर कड, हेंमत सोमवंशी, शांताराम अवसरे, मनोज कारंजे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. तसेच, सातपूरच्या नंदिनी शर्मा प्रकरणाचा यशस्वी तपास करणारे पोलिस निरीक्षक मनाेज करंजे पोलिस नाईक रमेश सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...