आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी दुरुस्त करत नागरिकांनी राेखली गळती,पालिका अायुक्त डॉ. गेडाम यांनी घेतली दखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होत असताना, शहरात जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे हजारो लिटर पाणी पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाया गेले. मात्र, यास अपवाद ठरले साईनगर येथील रहिवासी. येथील नागरिकांनी पुढाकार घेत गळती झालेली जलवाहिनी दुरुस्त करून हजारो लिटर पाणी वाचवले. नागरिकांनी केलेल्या कामाचे पालिका अायुक्तांनी कौतुक करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
महामार्ग परिसरातील साईनगर येथे जलवाहिनीला गळती सुरू झाल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात अाले. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पाणीपुरवठा विभागाशी नागरिकांनी संपर्क साधला, परंतु त्याची दखल घेतली गेल्याने अखेर नागरिकांनी परिसरातील एक प्लंबर बोलावून स्वत:च गळती रोखण्यासाठी काम सुरू केले. चार तासांनंतर पालिका कर्मचारी घटनास्थळी आले. तोपर्यंत नागरिकांना पाणीगळती रोखण्यास यश आले होते. परिसरातील धनंजय माने यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीने हे काम पूर्ण केल्याबद्दल पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी माने यांच्यासह नागरिकांचे अाभार मानले. संबंधित कर्मचाऱ्यांना धारेवर धरत या प्रकाराबाबत जाब विचारला. योगेश फड, प्रकाश देवरे, दामोधर बच्छाव, किशोर बडगुजर, योगेश शिवले, दामू शिरसाठ, दिलीप आव्हाड, विनोद शिरसाठ यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी पाइपलाइन गळती रोखण्यासाठी मदत केली.
बातम्या आणखी आहेत...