नाशिक - महापालिकेची अार्थिक स्थिती नाजूक असताना स्मार्ट सिटीतील परिवहन सेवा बळकटीकरणाच्या नावाखाली ताेट्यात चालणारी शहर बससेवा चालवणे किंवा बीअारटीएससारखा यापूर्वी तीव्र विराेधामुळे रद्द झालेला प्रयाेग पुन्हा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. यासंदर्भातील प्रस्तावाच्या मंजुरीचा घाट स्मार्ट सिटी स्पेशल पर्पज व्हेइकलच्या अाडून घातला जात असल्याची चर्चा अाहे. यामुळे सावध झालेल्या नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १६) हाेणाऱ्या महासभेत एसपीव्हीला विराेध कायम ठेवत मंजुरी देताना बससेवेची जबाबदारी मात्र काेणत्याही परिस्थितीत पालिकेच्या खांद्यावर येण्यासाठी भूमिका घेण्याची तयारी केली अाहे.
स्मार्ट सिटीच्या पहिल्या फेरीत नाशिकची गाडी हुकली हाेती. स्मार्ट सिटीला विराेधाचे प्रमुख कारण स्पेशल पर्पज व्हेइकल अर्थात एसपीव्ही ठरला हाेता. एसपीव्हीद्वारे एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापून त्याद्वारे स्मार्ट सिटीची सर्व कामे हाेणार असल्यामुळे एकप्रकारे महापालिका नगरसेवकांच्या अधिकारावर गदा येणार असल्याचा सूर उमटला हाेता. त्यासाठी केंद्र राज्य शासनाचा निधी मिळणार असला, तरी याेगदान देऊनही महापालिकेच्या स्वायत्ततेवर घाला घातला जाणार असल्याचे मत व्यक्त हाेत हाेते.
या पार्श्वभूमीवर गेल्या वेळी एसपीव्हीला महापालिकेतील महापाैर, उपमहापाैर अन्य पदाधिकाऱ्यांचाही संचालक मंडळात अंतर्भाव करून मंजुरी दिली गेली. तरीही पहिल्या फेरीत स्थान हुकल्यानंतर अाता जूनमध्ये दुसऱ्या फेरीच्या स्मार्ट सिटीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू झाली अाहे. त्यासाठी एसपीव्हीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव महासभेवर अाहे. या प्रस्तावात एसपीव्हीतील प्रशासकीय मंडळात महापाैर, उपमहापाैर अन्य पदाधिकाऱ्यांना स्थान असले तरी, अध्यक्षपद मात्र अायुक्तांकडे अाहे. त्यामुळे त्यास विराेध हाेण्याची शक्यता असताना पुणे साेलापूरमधील घटनाक्रम लक्षात घेत शासनाने अाधीच प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून ताेडगा काढण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यामुळे अाता विराेधासाठी बससेवेव्यतिरिक्त दुसरे काेणतेही ठाेस कारण उरले नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे महासभेतील प्रस्तावाचे काय करायचे यासंदर्भात महापाैर अशाेक मुर्तडक यांनी ‘रामायण’वर घेतलेल्या बैठकीत उपस्थित गटनेत्यांनी एसपीव्हीमुळे महापालिकेची स्वायत्तता धाेक्यात येईल, असे मत व्यक्त करीत विराेधाची भूमिका कायम ठेवली; मात्र लाेकप्रतिनिधींचा अंतर्भाव असण्यासारख्या काही अटी मान्य केल्यामुळे मंजुरीसाठी हरकत नसल्याचेही मत मांडले. मात्र, ताेट्यातील शहर बससेवा चालवण्यासाठी घेऊ नये बीअारटीएससारखा प्रस्ताव महापालिकेने राबवू नये वा त्यास छुपी मान्यता देऊ नये, अशी भूमिका मांडल्याचे सांगितले जाते. महासभेत यासंदर्भात नगरसेवक सविस्तर भूमिकाही मांडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक, शिवसेना गटनेता अजय बाेरस्ते, भाजप गटनेते सतीश कुलकर्णी, काँग्रेस गटनेते शाहू खैरे बैठकीला उपस्थित नसल्यामुळे त्यांची भूमिका समजू शकली नाही.
स्वायत्ततेवर घाला
^स्मार्टसिटीतील एसपीव्हीमध्ये अटी-शर्थीत मागणीप्रमाणे बदल झाला म्हणजे अामची संमती अाहेे असे नाही. एसपीव्हीमुळे महापालिकेची स्वायत्तता संपुष्टात येणार असल्यामुळे विराेध कायम राहील. - गुरुमित बग्गा, उपमहापाैर
प्रशासनराजची चुणूक
^एसपीव्हीमुळे लाेकप्रतिनिधी,पर्यायाने पालिकेची स्वायत्तता संपुष्टात येईल. प्रशासनाला सर्व कारभार अापल्या हातात हवा असून ही त्याचीच चुणूक अाहे. - संजय चव्हाण, सभापती,शिक्षण समिती