आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच दिवसांनंतर अखेर शहर बससेवा पूर्ववत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्याकाही दिवसांपासून निर्माण झालेली तणावाची परिस्थिती गुरुवारी नियंत्रणात आल्याने एसटी प्रशासनाकडून गुरुवारी (दि. १३) बससेवा पूर्ववत करण्यात आली. गुरुवारी जिल्ह्यातील सर्व अागारांसह शहर बससेवा सकाळपासून सुरू झाली होती. दरम्यान, गेल्या चार दिवसांत एसटीचे चार कोटींहून अधिक नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तळेगाव येथे पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. यानंतर या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याने ठिकठिकाणी वाहनांसह बसेसची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. या आंदोलनात महामंडळाच्या अाठ बस जाळण्यात आल्याने एसटी प्रशासनाकडून संपूर्ण बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी काही काळ बससेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, पुन्हा जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे बससेवा बंद करण्यात आली होती. तसेच गुरुवारी (दि. १३) तणावाची परिस्थिती नियंत्रणात गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्व आगारांसह शहरी बससेवा पुर्णपणे सुरू करण्यात आली. मात्र, कसारा, त्र्यंबकेश्वर या मार्गावरील बससेवा अद्याप बंदच ठेवण्यात अालेली आहेत. तसेच मुंबईची बससेवाही पुर्णपणे सुरु करण्यात आलेली नसून मुंबईला थोड्या-थोड्या बसेस सोडली जात आहे. तसेच गेल्या चार दिवसात या दंगलीमुळे एसटी प्रशासनाचा तब्बल चार कोटीचा नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

चार कोटींचे नुकसान
गेल्याकाही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या तोडफोड जाळपोळीचा एसटी महामंडळाला माेठा फटका बसला असून, चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत अाहे. २२ बस फोडण्यात आल्या, तर जाळल्या आहेत. तोडफोड, जाळपोळीच्या घटनेत एसटीचा कोटी ३६ लाख ९३६ रुपयांचा नुकसान झाले आहे. अद्यापही नुकसानीचा अाढावा सुरू अाहे.

सर्व बस सुरू
^जिल्ह्यात तणावाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने एसटी प्रशासनाकडून गुरुवारी (दि. १३) बससेवा पूर्ववत करण्यात आली. कसारा, त्र्यंबक वगळता सर्व बससेवा सुरू करण्यात आली आहे. -यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक
बातम्या आणखी आहेत...