आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज दाै-यापूर्वी शहरात ‘झाडू’झडती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: महापाैरांसह अायुक्तांनी केली रस्त्यांसह उद्याने आणि गाेदाघाटाची पाहणी
नाशिक - राज ठाकरे यांच्या दाै-याच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात तब्बल तीन तास प्रमुख रस्ते, उद्याने गाेदाघाटाची महापाैर, आयुक्तांनी पाहणी करून आवश्यक तेथे सफाई करून त्यासाठी आदेशही दिले. जवळपास ४०० काेटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचीही पाहणी केली.
महिनाभराच्या अंतराने राज ठाकरे नाशिक दाै-यावर येत असून, दाेन दिवसांत महत्त्वाच्या कामांचा आढावा घेतील. माेठ्या उद्यानांची स्थिती त्यासाठी सुचविलेल्या उपायांबाबत काय केले, याची माहिती ते घेतील. या पार्श्वभूमीवर महापाैर अशाेक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, शहर अभियंता सुनील खुने अधिका-यांनी बुधवारी सकाळपासून दाैरा सुरू करून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंगराेडची पाहणी करून पाथर्डी फाटा, अंबड एमआयडीसी, सातपूर, बारदान फाटा, गंगापूरराेड गोदाघाटाची पाहणी केली.

परीक्षेपूर्वीचा अभ्यास हाेणार नियमित : स्वाइनफ्लूच्या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालयांना भेट देऊन आराेग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आदेश महापाैरांनी िदले हाेते. राज दाै-याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रस्ते, उद्याने पाहणीनंतर ‘परीक्षेपूर्वीचा अभ्यास’ असे प्रतिक्रिया मनसेतील नगरसेवक खासगीत बोलत हाेते. दरम्यान, मुर्तडक यांनी आठवड्यातील दाेन दिवस शहरातील विविध कामांची अचानक पाहणी करण्यासाठी राखीव ठेवण्याचा मनाेदय माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला.

उद्यानांकडे गेले लक्ष
राजयांनी शहराची बाग करायची, अशी संकल्पना मांडली हाेती. त्यानुसार फाळके स्मारक उद्यान, पांडवलेणी येथील बाेटॅनिकल गार्डन, शिवाजी उद्यान आदींची कामे खासगीकरणातून देण्याच्या दृष्टिकाेनातून प्रक्रिया सुरू झाली. या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज काव्य उद्यान, वसंत कानेटकर उद्यानाची महापाैरांसह अधिका-यांनी पाहणी केली. या उद्यानांची दुरवस्था दूर करावी सफाई नियमित करावी, अशा सूचनाही महापाैरांनी केल्या.