आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • City Development Planning Ready For Nashik Residents

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहराचा विकास अाराखडा अाज नाशिककरांच्या दरबारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तब्बल दीड वर्षाच्या विलंबानंतर नव्याने तयार केलेला नाशिक शहराचा प्रारूप विकास अाराखडा शनिवारी जनतेच्या दरबारात दाखल हाेणार असून, पुढील ६० दिवस म्हणजेच जवळपास दाेन महिने या अाराखड्यावर हरकती सूचना करण्यासाठी नागरिकांना अवधी दिला जाणार अाहे. हा अाराखडा लाेकांना नगररचना सहसंचालक कार्यालय तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध राहणार अाहे.

साधारण दाेन वर्षांपूर्वी अर्थातच २०१३ मध्ये नाशिक शहराचा विकास अाराखडा शासनाला सादर करण्याच्या प्रक्रियेत असतानाच अचानक फुटल्यामुळे वातावरण चांगलेच तापले हाेते. या विकास अाराखड्यात अनेक शेतकऱ्यांच्या हिरव्यागार जमिनीवर अारक्षणे हाेती, तर शेजारील वजनदार व्यक्ती वा धनदांडग्यांच्या जमिनी सुटल्यामुळे संशय व्यक्त केला गेला. कालांतराने पुढे बिल्डरधार्जिणा, शेतकरीविराेधी असे अनेक अाक्षेप वा अाराेप करीत सामाजिक संघटनांनी विकास अाराखड्याविराेधात दंड थाेपटले. शहराच्या विविध भागात विशेषत मळे विभागातून या अाराखड्याच्या विराेधात शेतकरी एकवटले हाेते. ठिकठिकाणी बैठका घेण्यात येऊन त्यात या अाराखड्याला तीव्र विराेध करण्यात अाला हाेता. यानंतर महासभेत सर्वपक्षीयांनी एकजूट दाखवत हा विकास अाराखडा फेटाळल्यानंतर पुढे शासनानेही त्यावर शिक्कामाेर्तब केले. त्यानंतर मात्र तत्कालीन सहसंचालक सुलेखा वैजापूरकर यांची बदली करून त्यांच्या जागी प्रकाश भुक्ते यांची िनयुक्ती करण्यात अाली.

यापूर्वीचा विकास अाराखड्याबाबतचा वाद लक्षात घेता, भुक्ते यांनी सावधपणे काम सुरू केले. अारक्षणे टाकण्यापूर्वी प्रत्यक्ष जागेची पाहणीही केली. येथील लाेकांचे म्हणणेही जाणून घेतले.
शहराचा विकास अाराखडा जास्तीत जास्त पारदर्शी कमीत कमी वादात असण्याचा प्रयत्न लपून राहिला नाही. त्याचाच एक भाग म्हणून दाेन महिन्यांपूर्वी भुक्ते यांनी महापालिकेतील पदाधिकारी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या अपेक्षा, सूचना समज-गैरसमज जाणून घेण्याचे प्रयत्नही केले हाेते. दरम्यान, विकास अाराखडा प्रसिद्धीची अधिसूचना शुक्रवारी प्रसारमाध्यमांकडे प्रसिद्धीसाठी दिली असून, शनिवारच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या अंकात ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर या अाराखड्यावरील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध स्वरूपाच्या हरकती सूचनांची प्रक्रिया सुरू हाेईल, असे नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी सांगितले.

हरकतीसूचना मागविणार : शहरविकास अाराखडा पारदर्शक पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न भुक्ते यांनी केला असून, शनिवारी हा अाराखडा जनतेच्या दरबारी दाखल झाल्यानंतर या अाराखड्यावरील जनतेच्या हरकती तसेच सूचना मागविल्या जाणार अाहेत. यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात अाली असल्याने या कालावधीत अतिशय उत्सुकता असलेल्या या अाराखड्यात नेमके काय अाहे, याचा अभ्यास करून नागरिकांना नेमक्या सूचना करता येतील. तसेच काही बाबी खटकल्यास त्यास हरकतही घेता येणार अाहे. मात्र, हे सर्व साठ दिवसांच्या अात दिलेल्या मुदतीत संबंधित कार्यालयात हरकती सूचना पाठवून करावे लागणार अाहे.
यापूर्वीचा अाराखडा फुटल्यानंतर या विषयाबाबत व्यापक अशी जनजागृती झाली हाेती. शेतकरी जमीनमालक या प्रश्नावर एकवटल्याने या विषयाबाबत व्यापक जनजागृती झाली हाेती. त्यातून महासभेत हा अाराखडा फेटाळला गेला हाेता जनतेचा या विराेधातील रेटा दिसून अाल्याने राज्य शासनानेही त्यावर शिक्कामाेर्तब केले हाेते.

नागरिकांनी अाराखड्याचे अवलाेकन करावे
नाशिकशहर विकास अाराखड्याचे अवलाेकन करून जास्तीत जास्त लाेकांनी त्यात सुधारणेच्या दृष्टीने सूचना हरकती नाेंदवाव्यात. या अाराखड्याच्या प्रति संबंधित कार्यालयात उपलब्ध असतील. तसेच महापालिकेच्या राज्य शासनाच्या संकेतस्थळावरही या प्रति शनिवारी दुपारपर्यंत प्रसिद्ध हाेईल. प्रसिद्धीपासून ६० दिवसांत हरकती दाखल करता येतील. प्रकाशभुक्ते, सहसंचालक, नगररचना विभाग

येथे मिळेल अाराखडा
शहराच्याविकास अाराखड्याचा तपशील जाणून घेण्यासाठी विकास िनयंत्रण नियमावली, विकास याेजना, अारक्षणांची स्थिती जाणून घेण्यासाठी नकाशे अादी महत्त्वाचे दस्तएेवज नागरिकांना विहित शुल्क भरून उपलब्ध हाेतील. विभागीय अायुक्तालयातील नगररचना सहसंचालक यांचे कार्यालय, महापालिकेतील अायुक्त कार्यालय तसेच नवीन पंडित काॅलनी येथील जुनी महापालिका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील नगररचना सहायक संचालकांच्या कार्यालयातही या प्रति उपलब्ध हाेणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले अाहे.
याबराेबरच शनिवारी दुपारपर्यंत महानगरपालिकेच्या www.nashikcorporation.in तर शासनाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध हाेणार असल्याचे भुक्ते यांनी सांगितले.