आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील उद्यानांना प्राप्त हाेणार गतवैभव; २२८ कामांना तत्काळ प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दाेन वर्षांपासून भिजत पडलेल्या उद्यान देखभाल दुरुस्तीला अखेर मुहूर्त गवसला असून, निविदा मंजुरीची प्रक्रिया स्थायी समितीत पूर्ण झाल्याने अाता शहरातील २२८ उद्यानांची कामे हाती घेतली जाणार अाहेत. यासाठी सुमारे ११ काेटी इतका खर्च येणार अाहे. तीन वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचा हा ठेका देण्यात येणार अाहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे ‘नवनिर्माण’ करण्याचा हा फंडा किती उपयुक्त ठरताे, हे अागामी काळातच ठरणार अाहे.
शहरातील उद्यानांची संख्या ३०० पेक्षा अधिक अाहे. परंतु, स्थानिक संस्था कर, अर्थात एलबीटीचे उत्पन्न पालिकेच्या हातून गेल्यानंतर प्रशासनाची माेठीच अार्थिक काेंडी झाली. त्यामुुळे मूलभूत कामांवरच भर देण्याचे धाेरण प्रशासनाने अवलंबिले हाेते. त्यानंतर सिंहस्थाच्या कामावरही प्रशासनाचा माेठा खर्च झाला. त्यामुळे उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष झाले. परिणामत: काही अपवाद वगळता शहरातील उद्यानांची अत्यंत दुरवस्था झाली अाहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीत उद्यानांची दुरवस्था हादेखील प्रमुख मुद्दा हाेण्याची शक्यता अाहे. या विचाराने सत्ताधाऱ्यांनी उद्यानांच्या देखभालीचा प्रस्ताव तयार करण्याचे अादेश प्रशासनाला दिले हाेते. त्यानुसार पालिका आयुक्तांनी २८६ उद्यानांच्या देखभालीसंबंधी एकत्रित ठेका देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मांडला होता. परंतु, हा ठेका महिला बचतगटांना द्यावा, असा निर्णय महापौरांनी जाहीर केला होता. महासभेच्या निर्णयानंतर प्रशासनाने या ठेक्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली; परंतु एखादी कंपनी नजरेसमोर ठेवून तयार केलेल्या प्रस्तावातील जाचक अटींमुळे त्याला अल्प प्रतिसाद लाभला. प्रशासनाला त्यासाठी फेरनिविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. महिला बचतगट यांची आर्थिक कुवत लक्षात घेऊन सदर निविदेतील अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्यानुसार प्रशासनाने अटी-शर्ती शिथिल करण्याची कार्यवाही केली. त्यानंतर स्थायीत हा प्रस्ताव मंजूर हाेऊन ठेकेदारांना कामे देण्यात अाली अाहेत.
कानेटकरउद्यानासाठी ६६ लाख : वसंतकानेटकर उद्यानात देखभाल दुरुस्तीसाठी ६६ लाख ६४ हजारांची कामे हाती घेतली जाणार अाहेत.

राेपे लागवडीचा मार्ग माेकळा : वृक्षाराेपणासंदर्भातीलरखडलेले काम अाता नवीन निविदा मंजुर झाल्याने मार्गी लागणार अाहे. गुरुवारी सभेत १५ हजार २०० वृक्षांसाठी काेटी ६५ लाखांच्या निधीस मंजुरी देण्यात अाली. त्यात पश्चिम पंचवटी विभागात ११६७, सातपूर सिडकाे विभागात ११६७, पूर्व नाशिकराेड विभागात ११६६ तर गंगापूरराेड, बारदान फाटा, अमृत गार्डन, सातपूर, अंबड लिंकराेड, त्र्यंबकराेड या भागात हजार ९१५ राेपे लावण्याचा समावेश अाहे.

कमी दराने निविदा मंजूर : विशेषम्हणजे उद्यानांच्या कामाच्या निविदा कमी दराने मंजूर करण्यात अाल्या अाहेत. पश्चिम विभागाच्या ३७.५० टक्के, पूर्व २४ टक्के, सिडकाे ४९ टक्के, सातपूर १६.५ टक्के, तर नाशिकराेड विभागाची निविदा १९ टक्के इतक्या कमी दराने मंजूर झाली अाहे.

पंचवटीतील कामे सुरू : पंचवटीविभागातील ५४ उद्यानांची कामे यापूर्वीच मंजूर असून, त्यांना सुरुवातही झाली अाहे. या कामांना काेटी ५१ लाख इतका खर्च हाेणे अपेक्षित अाहे.
या प्रस्तावांनाही मिळाली मंजुरी
{वृक्षगणनेसाठी काेटी १३ लाख, ७५ हजार रुपयांच्या \\खर्चास देण्यात अाली मंजुरी
{ फाळके स्मारक बुद्धविहार येथे जिल्हा सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा पर्यवेक्षक अाणि १७ सुरक्षारक्षक घेण्यासाठी २० लाख ८३ हजार ९६४ काेटींच्या खर्चास मंजुरी
{ पाथर्डी फाटा येथे चाैक विकसित करण्यासाठी ६१ लाख २४ हजार ७३४ रुपये खर्चास मंजुरी. या प्रस्तावांनाही मिळाली मंजुरी
बातम्या आणखी आहेत...