आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Management Seminar Issue At Nashik, Divya Marathi

शहर व्यवस्थापनावरील परिसंवादास जिल्हाधिकारी, अधिका-यांची गैरहजेरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भविष्यातील ‘ स्मार्ट सिटी’ असे उज्ज्वल भवितव्य असलेल्या नाशिकच्या विकासाचे व्यवस्थापन कसे असावे, आगामी कुंभमेळ्याचा विचार करता काय नियोजन करता येऊ शकेल यांसारख्या चांगल्या विषयावर नाशिक मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘मॅनेजमेंट नाशिक डिस्ट्रिक्ट-2014’ या परिसंवादावर नाशिककरच नाही तर प्रशासनानेही पाठ फिरविल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.
जिल्हाधिकारी विलास पाटील, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणि महापालिका आयुक्त संजीवकुमार या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने राजकीय नेत्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. कालिदास कलामंदिर येथे मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी, सभागृहनेते शशिकांत जाधव, सिटिझन फोरमचे अध्यक्ष जितुभाई ठक्कर, क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर, नाशिक मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष व्हिनस वाणी, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी होते.
..अन् उपस्थितांना झाली कुंभमेळ्याची आठवण
कुंभमेळा तोंडावर आला तरी प्रशासनाकडून त्याकरिता ज्या वेगाने काम होणे अपेक्षित आहे, ते होत नाही, प्रशासन उदासीन असल्याचा आरोप साधू-महंत करीत आहेत, याची आठवण उपस्थितांना या कार्यक्रमात आली. एनएमएने अतिशय चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊनही प्रशासनातील जबाबदार अधिका-यांनी मात्र त्याकडे पाठ फिरविल्याने प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली होती.