आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य विभागाचे काम करताहेत शहरातील पोलिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यात पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असताना, गोदावरी घाटावरील बेघरांसह भिकाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारीही आता पोलिस दलावर येऊन पडली आहे. वास्तविक बेघरांसह भिकाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी मनपा आणि सिंहस्थ प्रशासनाच्या आरोग्य विभागावर असताना, दोन्ही विभागांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे.

कुंभमेळ्यात पोलिसांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचा ताण असणार आहे. या काळात भिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न अद्याप महापालिका प्रशासनाने सोडवलेला नाही. यातील बहुतांशी भिकारी आजारी असल्याचे त्यांच्या शारीरिक परिस्थितीवरून दिसून येते.
एकीकडे प्रशासनाकडून गोदाघाट स्वच्छ केला जात आहे. मात्र, त्यानंतर रात्रीतून भिकाऱ्यांकडून पुन्हा अस्वच्छता पसरवली जाते. ही सारी परिस्थिती पाहता पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे ज्येष्ठ नागरिकांसह गोदाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, सोमवारी (िद. २५) पोलिसांनी ६५ भिकाऱ्यांसह बेघर नागरिकांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.
वास्तविक, पालिकेच्या सहकार्याने गोदाघाटावर तात्पुरते तपासणी केंद्र सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, केवळ नियोजन सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात होती. अखेर पोलिसांनी पुढाकार घेत आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतला.
बातम्या आणखी आहेत...