आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलमधील एजंटगिरी पुन्हा चर्चेत, मध्यस्थां’शिवाय कामेच होत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; सर्वचशासकीय कार्यालयांमध्ये ‘मध्यस्थां’शिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याला आरोग्य विभागही अपवाद नाही. मध्यस्थांच्या मदतीने आरोग्य विभागात एकही कागद इकडचा तिकडे होत नसल्याचे जिल्हा रुग्णालयात झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोमवारच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला चार हजारांची लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर रुग्णालयातील ‘एजंटगिरी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

जिल्हा रुग्णालयात लाच घेणे हा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दोन जिल्हा शल्यचिकित्सक, वरिष्ठ लिपिक, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याला ‘एसीबी’ने रुग्णालयाच्या आवारात पकडले. ही घटना आरोग्य विभाग विसरत नाही तोच पुन्हा डॉ. परशराम भोये यास चार हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. मध्यस्थ विजय गवांडे याला पथकाने अटक केली. हा खासगी कर्मचारी सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून येथे कार्यरत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला.
यापूर्वीच्या लिपिकांसह विद्यमान लिपिकांची मेहेरबानी असल्याने तो शासकीय कर्मचाऱ्यासारखा वावरत होता. आश्चर्य म्हणजे शासकीय रेकॉर्ड विभागाची चावीदेखील या व्यक्तीकडे राहत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनादेखील हा विभागाचा कर्मचारी नसल्याचे सोमवारच्या कारवाईनंतर समजले.

कडक कारवाईची अपेक्षा
रुग्णालयाच्याआवारात एजंटचा सुळसुळाट झाला असून, पोलिस विभागासह सर्व शासकीय विभागांची वैद्यकीय बिले रखडली आहेत. काही शासकीय कर्मचाऱ्यांनी या खासगी कर्मचाऱ्यांकडे अागाऊ रक्कम जमा केली असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. नवीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी कडक कारवाई करून येथील एजंटगिरी मोडीत काढण्याची अपेक्षा खुद्द रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
धक्कादायक