आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलमध्ये ‘काम बंद’, आंदोलनामुळे बाह्यरुग्ण विभागात रुग्णांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांना बुधवारी (दि. २३) झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा रुग्णालयात गुरुवारी ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले असून, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनामुळे बाह्यरुग्ण विभागात रुग्णांचे हाल झाले.

सुप्रिया माळी या विद्यार्थिनीचा मृत्यू उपचारांत हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत प्रशिक्षणार्थींनी वादावादी केली होती. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत राजकीय पक्षांशी संपर्क साधत परिचारिका महाविद्यालयाचा गलथान कारभार शल्यचिकित्सकांसह गृहपालांविरोधात तक्रारी केल्या. या गोंधळातच जिल्हा शल्यचिकित्सक विद्यार्थिनींना समजावत असताना त्यांनी फोटाे घेतला. याचा राग अाल्याने एका मुलीने तिच्या मामाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्याचा जाब विचारणाऱ्या विवेक तांबे यांनी शल्यचिकित्सकांना मारल्याने आंदोलन पुकारण्यात आले.
डॉ. माले माले यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक प्रतिबंध कायदा कलम आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो), परिचारिका संघटना, अधिकारी कर्मचारी संघटनांसह चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. गुरुवारी सकाळी पुन्हा आंदोलन सुरूच ठेवण्यात आल्याने सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागात रांगा लागल्या होत्या. एकही डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिका नसल्याने हाल झाले. परिचारिकांच्या बाजूने आंदोलन करणारे राजकीय नेते रुग्णांसाठी आंदोलन का करत नाहीत, असा संताप अनेक रुग्णांनी व्यक्त केला. प्रकरण चिघळवण्यास राजकीय नेतेच जबाबदार असल्याचा आरोपही रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शल्यचिकित्सकांना मारहाणीचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.

पालकांचेसमर्थन : प्रशिक्षणार्थींवरीलनिर्बंध योग्यच असल्याचे सांगून बुधवारच्या प्रकरणात आमचे पाल्य सहभागी असतील, तर त्यांच्या कारवाई करावी, असेही काही पालकांनी सांगितले. ज्यांना नियमांचे पालन करता येत नाही, अशा विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून द्यावे, अशी भूमिका रामरत्न इंदवे, बाळासाहेब शिंदे यांच्यासह काही पालकांनी घेत रुग्णालय प्रशासनाचे समर्थन केले.
रुग्णालयवाऱ्यावर : वैद्यकीयअधिकारी आंदोलनानंतर घरी निघून गेल्याने रुग्णालयाची सेवा रामभरोसे आहे. अतिदक्षता विभाग आणि तत्काळ उपचार मात्र सुरू ठेवण्यात आले आहेत.
तक्रारनाही : मृतसुप्रिया माळीच्या नातेवाइकांच्या विनंतीनुसार शवविच्छेदन करताच मृतदेह ताब्यात दिला. मात्र, काही विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कामकाजाचीचौकशी : सुप्रियामाळी हिच्या मृत्यूसह गृहपाल, जिल्हा शल्यचिकित्सक, मेट्रन यांची चौकशी होणार आहे. डॉ. बी. डी. पवार, डॉ. डी. एन. पाटील, महेश बोटले या सदस्यांची समिती चौकशी करीत आहे. दरम्यान, वस्त्रपाल संध्या गांगुर्डे यांना तत्काळ मूळ पदावर पाठवण्यात आले. त्यांच्या जागी लष्करे, दिवेकर यांची नियुक्ती केली. सहायक अधिसेविका कुलकर्णी यांना देखरेखीची जबाबदारी दिली आहे.

रुग्णालयाचेआंदोलन मागे : उपसंचालक,जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी कुंभमेळ्यात रुग्णसेवा खंडित होऊ नये याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका संघटना, कर्मचारी संघटनांना विनंती केली. विनंतीला मान देत सांयकाळी चार वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

काम असुरक्षित
आरोग्यविभागात काम करणे असुरक्षित आहे. मारहाण म्हणजे सर्व आरोग्य यंत्रणेला मारहाण आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. पूजापवार, अध्यक्षा, नर्सेस असोसिएशन

कारवाई होणार
मारहाणकरणाऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. तक्रार उशिरा दाखल झाल्याने त्याला पळण्यास वेळ मिळाला. संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. हेमंतसोमवंशी, वरिष्ठ निरीक्षक, सरकारवाडा पोलिस

चौकशी करणार
रुग्णालयातप्रथमच असा प्रकार घडला. चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येऊन अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. डॉ.बी.डी. पवार, उपसंचालक

रुग्णसेवा सुरूच आहे
शासकीयजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज बंद आहे. मात्र, तत्काळ सेवेसह अांतररुग्ण विभागात रुग्णसेवा सुरूच आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांना मारहाण हा प्रकार निंदनीय आहे. - डॉ.जी. एम. होले

आंदोलन चिघळविले
प्रशिक्षणार्थींनासिंहस्थ काळात सुटी मिळाली नव्हती. त्यांना बाहेर सोडले जात नाही, मोबाइलही वापरू दिला जात नसल्याने त्यांच्यात संताप होता. या घटनेने त्याचा उद्रेक झाला.

काँग्रेसचे निवेदन
काँग्रेसनेपोलिस आयुक्तांना निवेदन देऊन या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली असून, डॉ. माले यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. प्रशिक्षणार्थीचा मृत्यू देखील संशयास्पद असल्याचा अारोप करण्यात आला आहे.