आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेग्य कर्मचाऱ्यांना महापाैरांचा पाेलिसी खाक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘तुमच्याप्रभागात ब्लॅक स्पाॅट किती? खरं उत्तर द्या, नाही तर तुमची खैर नाही...’ कर्मचाऱ्याने उत्तर दिले, तर लगाेलग त्याची पाेलखाेल करीत दडवलेल्या स्पाॅटचीही माहिती तयार. महापाैर अशाेक मुर्तडक यांनी अाराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना जणूकाही पाेलिसी खाक्याच दाखवला. अस्वच्छता अाढळली कचऱ्याच्या ठिकाणांची खाेटी माहिती दिली, तर गय करणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.
कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या पर्वण्या झाल्यानंतर शहरातील स्वच्छता कायम ठेवून साथराेग पसरण्याच्या दृष्टीने अावश्यक उपाययाेजनांचा अाढावा महापाैरांनी बैठकीत घेतला. बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बी. अार. गायकवाड, अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे, सहाही विभागीय अधिकारी, विभागीय स्वच्छता निरीक्षक प्रभाग पातळीवर स्वच्छता करणाऱ्या अाराेग्य कर्मचाऱ्यांना बाेलावण्यात अाले हाेते. महापाैर शहरातील कचराकुंड्यांची पाहणी वा माहितीच घेऊन ते अाल्याचे दिसत हाेते. विभागीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एखाद्या ठिकाणी पाच ब्लॅक स्पाॅट सांगितले तर, उर्वरित स्पाॅटची माहिती ते सांगत हाेते. महापाैरांच्या दरडावणीनंतर कर्मचारीही त्याची कबुली देत हाेते.

लाेक एेकत नसतील अशा जागांवर कॅमेरे बसवून त्यानंतर जाे अाढळेल, त्याच्यावर प्रसंगी फाैजदारीही करा, असे अादेशही महापाैरांनी दिले. जुने नाशिक भागात भंगारवाले, तसेच शहरातील तबेलेवाल्यांना नाेटिसा देण्याचेही अादेश दिले.

राेगराईवर नियंत्रण हवे
^सर्दी,खाेकला, तापाचे रुग्ण वाढले अाहेत. याचे मूळ कचराकुंड्यंामध्ये अाहे. तीन शिफ्टमध्ये कर्मचारी ठेवा, त्यांना शिस्त लावा. घाण करणाऱ्यांना नाेटीस द्या, प्रसंगी अतिक्रमणाचे कर्मचारी वापरून त्यांचे साहित्य जप्त करा, असे अादेश दिले अाहेत. अशाेकमुर्तडक, महापाैर

अधीक्षक धारेवर
डेंग्यूचेरुग्ण सापडत असताना तुम्ही किती घरांत जाऊन प्रत्यक्ष उत्पत्तीची ठिकाणे बघितली, असा सवाल महापाैरांनी करीत वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरले. तुम्हीच स्पाॅटवर गेला नाहीत, तर कर्मचारी जातात की नाही हे कळणार कसे, असेही सुनावले. खासगी रुग्णालये गंभीर साथराेगाची माहिती कळवत नाहीत अाम्ही माहिती दिल्यानंतर कारवाईही करीत नाहीत, असेही फटकारले. यापुढे हे खपवून घेतली जाणार नाही जे माहिती कळवणार नाहीत, त्यांना नाेटिसा काढा, असे अादेश महापाैरांनी दिले.