आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलमध्ये परिचारिकेचा मृत्यू, गाेंधळात दोन प्रशिक्षणार्थी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रशिक्षणार्थी परिचारिकेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर बुधवारी (दि. २३) सकाळी परिचारिकेचे नातलग इतर प्रशिक्षणार्थींनी डाॅक्टरांवर हलगर्जीपणाचा अाराेप करीत तीव्र अांदोलन केले. काही परिचारिकांच्या संतप्त पालकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एकनाथ माले यांना मारहाण केल्याने तणाव निर्माण हाेेऊन बराच काळ रुग्णालयात गाेंधळाची स्थिती झाली हाेती.
जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय अाणि वसतिगृहातील नर्सिंगची विद्यार्थिनी सुप्रिया माळी (वय १९, नंदुरबार) चार दिवसांपासून अाजारी असल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात अाले होते. मंगळवारी सुप्रिया खाटेवरून खाली पडल्याने तिची प्रकृती अधिकच गंभीर झाली हाेती. मध्यरात्री तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुप्रियावर योग्य वेळी उपचार केल्यामुळे तिच्याकडे काेणीही लक्ष दिल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी केला. प्रशासनावर गलथानपणाचा अाराेप करीत त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडला. निवासी शल्यचिकित्सक डाॅ. हाेले यांना घेराव घालण्यात अाला. डाॅ. हाेले यांनी त्यांची समजूत काढून वसतिगृहाच्या अात त्यांना बाेलाविले.
प्रशिक्षणार्थी त्यांच्याशी चर्चा करताना अचानक वरून एक माेठी काच खाली पडल्याने नयना परमार आणि विशाल चौधरी हे प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाले. हे पाहून काही प्रशिक्षणार्थी महिलांना भाेवळ येऊन त्या खाली काेसळल्या. काहींनी या प्रकाराची खूपच धास्ती घेतल्याने त्यांच्या ताेंडातून शब्दही फुटत नव्हता. अशा जवळपास १५ विद्यार्थ्यांना
.तर ती वाचली असती
तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या अांदाेलनाची माहिती मिळताच आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, प्रशिक्षणार्थी अांदाेलनकर्त्यांनी घेतलेला अाक्रमक पवित्रा पाहून वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बंदाेबस्त तैनात केला. पाेलिस अधिकारी, अामदार फरांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एकनाथ माले अाणि इतर अधिकारी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी चर्चा करून यावर ताेडगा काढण्यासाठी समिती स्थापना करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयाच्या वाॅर्डनविराेधातील तक्रारींचा सूर पाहता त्यांची तातडीने बदली करण्याचे अादेश फरांदे यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अांदाेलन मागे घेतले. प्रकरण मिटत असतानाच मृत सुप्रिया माळीच्या नातलगांनी रुग्णालयात धाव घेतली. याच गर्दीत प्रशिक्षणार्थींच्या नातलगांनी डाॅ. माले यांना जाब विचारत तेथील असुविधांचा पाढा वाचला. एकाने त्यांच्या कानशिलात लगावल्याने पळापळ हाेऊन तणाव वाढला.

‘कामबंद’चा इशारा : जिल्हाशल्यचिकित्सक माले यांना मारहाणीच्या निषेधार्थ रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच, माले यांना मारहाण करणारे विवेक तांबे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीयपक्षांचेही आंदोलन : दरम्यान,‘रिपाइं’चे दीपक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालयात आंदोलन करून जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांच्याकडे समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

मलाच केली धक्काबुक्की
माझ्याभाचीसोबत वाॅर्डनने केलेल्या गैरवर्तणुकीबाबत डाॅ. माले इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली असताना त्यांच्याकडून आम्हालाच उद्धट बोलून धक्काबुक्की करण्यात आली. विवेकतांबे, प्रशिक्षणार्थी परिचारिकेचे नातेवाईक

सुप्रिया अाजारी पडल्यापासून अॅडमिट होण्यासाठी वाॅर्डनला सांगत होती. तिच्यासोबत कोणी राहिले असते, तर ती पडली नसती आणि तिचे प्राण वाचले असते. भाग्यश्रीकाळे, प्रशिक्षणार्थी परिचारिका

सुटीच दिली जात नाही...
वर्षभरापासूनयेथे राहतोय. मुलींना बाहेर जाऊ दिले जात नाही. आजारी असूनही सुटी दिली जात नाही. मयुरीमराठे, प्र. परिचारिका

अांतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव परिसर अानंदनगर भागात एलइडी दिवे लावणार असल्याची माहिती नगरसेविका संगीता गायकवाड यांनी दिली. एलइडी दिवे लावल्यानंतर महापालिकेच्या जुन्या फिटिंग काढून प्रभागात इतरत्र ज्या भागात अंधाराचे साम्राज्य अाहे, त्या ठिकाणी लावून प्रभाग अंधारमुक्त करण्याचा संकल्पही त्यांनी केला अाहे. प्रभागात लावले जाणारे एलइडी दिवे नाेएडा येथून खरेदी करण्यात अाले असून, त्यांची एक वर्षाची गॅरंटी अाहे.

..असाअाहे प्रभाग
१६हजार ३२० लाेकसंख्येच्या प्रभाग ५९ मध्ये धाेंगडे मळा, जैन भवन, अानंदनगर, मुक्तिधाम परिसर, गायकवाड मळा, अाडकेनगर, भवानीनगर, घाडगेनगर, माणिकनगर अादी परिसराचा समावेश अाहे.

उपक्रमातखाे घालण्याचा प्रयत्न : उपक्रमाच्याच्याकामाच्या प्रारंभाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विद्युत विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी या उपक्रमात खाे घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेविका संगीता गायकवाड यांनी थेट महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्याकडे स्वखर्चाने एलइडी लावण्याच्या परवानगीचा अर्ज सादर करून उपक्रमात खाे घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले.

उपचारात हलगर्जीपणा नाही...
माळीच्याउपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा दुर्लक्ष झाले नाही. तिच्या उपचारासाठी मुंबई येथील विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही सल्ला घेण्यात आला होता. वसतिगृहाचे वाॅर्डन मेन्टरची तत्काळ बदली करण्यात आली. एकनाथमाले, जिल्हा शल्यचिकित्सक

प्रशिक्षणार्थींमध्ये दहशत आणि भीती
सुप्रियालाअाजारपणाची सु्टी नाकारण्यात अाल्याने तिने अंगात ताप असताना काम केल्यानेच तिची प्रकृती गंभीर झाल्याचा अाराेप बहुतांश प्रशिक्षणार्थींनी पाेलिस अामदार फरांदे यांच्याकडे केला. डाॅ. माले यांच्याकडे प्रशासनाच्या कामकाजाचा निषेध करण्यात अाला. प्रशासनाकडून अांदाेलनकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अथवा नापास केले जाईल, या भीतीने धास्तावलेल्या १५ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात अाले. गेल्या तीन दिवसांत ३५ विद्यार्थी आजारी पडल्याची माहिती खुद्द डाॅ. माले यांनीच दिली.

समिती स्थापन करणार...
प्रशिक्षणार्थीच्याअडचणीसाठी शासकीय अशासकीय नागरिकांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे विद्यार्थ्यांकडून काेणतीही तक्रार आल्यास थेट शल्यचिकित्सकांवरच कारवाई केली जाईल. अामदारदेवयानी फरांदे

प्रशिक्षणार्थींच्या तक्रारी
महाविद्यालयाच्यावसतिगृहातील जेवणाचा दर्जा निकृष्ट, तेही वेळेवर मिळत नाही
सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांनाच स्वच्छतेची सक्ती
आजारी असल्यावर उपचारासाठी गेल्यास सुट्टी कापण्यात येते.
मुलींकडून शौचालये स्वच्छ करून घेतली जातात.

नातेवाईकांकडे तक्रार केल्यास ‘परीक्षेवर परिणाम’ होण्याची धमकी वरिष्ठांकडून दिली जाते.
जिल्हा शल्य चिकित्सकांशी प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या अाप्तांची बाचाबाची झाल्यानंतर अन्य डाॅक्टरांनी मध्यस्थी केली. उजवीकडे जखमी प्रशिक्षणार्थीवर उपचार करताना परिचारिका.