आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सिव्हिल’मध्ये घेतात पैसे, देण्यात येत नाही एक्स-रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून एक्सरे काढण्यासाठी पैसे घेण्यात येतात. परंतु त्यांना एक्स-रे काढून देण्यात येत नाही अशी रुग्णांची तक्रार आहे. गेले पंधरा दिवस हा प्रकार सुरू आहे. दरम्यान, याबाबत विचारले असता, या गोष्टींना नकार देत फिल्मचा तुटवडा असल्याचे हॉस्पिटल प्रशासन सांगत आहे.
बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) अाजाराचे निदान करण्यासाठी एक्स-रे काढण्यात येतो. रुग्णांकडून साधा एक्स-रे काढायचा असेल तर ५० रुपये तर डिजिटल काढायचा असेल तर सिंगल प्रतसाठी ७५ रुपये घेण्यात येतात. येथे उस्मानाबाद, विजापूर, लातूरसह जिल्ह्यातील अपघातग्रस्त जखमींसह इतर आजारांचे रुग्ण दाखल होतात. दररोजचा कोटा ठरल्यापेक्षा अधिक एक्स-रे काढण्यात येतात. फिल्मचा एप्रिलमध्ये वर्षातून एकदाच पुरवठा करण्यात येतो. तो वर्षभर वापरणे अपेक्षित आहे. सहा महिन्यांत फिल्मचा साठा संपवण्यात आला आहे.
पुण्यातून मागवले
^शासन पत्रकानुसार एक्स-रे फिल्मचा पुरवठा होतो. पुरवठ्यासंबधी संबंधित पुरवठादार यांना कळवले आहे. त्यानुसार सिव्हिलमध्ये एक्सरे फिल्म येतील. परंतु सध्या पुण्याहून एक्स-रे फिल्म आणल्या आहेत. त्यावर काम होत आहे.” डॉ.राजाराम पोवार, अधिष्ठाता, सिव्हिल हाॅस्पिटल,

दिवसा अडीचशेची मर्यादा, काढण्याचे प्रमाण साडेतीनशे
दिवसा काठीएक्स-रे विभागाला २५० फिल्मची मर्यादा आहे. मात्र, येणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा अधिक आहे. किमान साडेतीनशे रुग्ण दर दिवसा एक्स-रे काढण्यासाठी येतात. त्यामुळे वर्षाचा फिल्मचा कोटा सहा महिन्यांनंतर संपत आलेला असतो.

ऑनलाइन एक्स-रे चा प्रश्न
ऑनलाइन एक्स-रे पाहता यावा यासाठी ही सुविधा आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णांचा एक्सरे काढला तर तो उपचार तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या केसपेपरवरील नोंदणी क्रमांकद्वारे पाहता येतो. परंतु ही सुविधा फक्त ‘ओपीडी’ पुरती मर्यादित असल्याने वाॅर्डात असलेल्या रुग्णांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ऑनलाइन एक्स-रे सुविधामुळे फिल्म खराब होणे हा प्रकार टळला आहे. तसेच खासगी डॉक्टरांना एक्सरे दाखवण्यावर बंदी आली आहे.