आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Civil Water Channel Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या नाशकात पाण्यासाठी वणवण, सिव्हिल जलवाहिनीच्या दुरुस्तीचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे जुन्या नाशिकच्या अनेक भागांत बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली.
जुन्या नाशिकला पाणीपुरवठा करणारी जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळील जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री अचानक दाब वाढून फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू करण्यात आल्याने जुने नाशिक भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मंगळवारनंतर बुधवारीही पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३, २४, २६, २७, २९ या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जवळपास २४ तास पाण्यापासून वंिचत राहावे लागल्याने जुन्या नाशिककरांच्या घशाला कोरड पडली होती. अनेक नागरिकांना महागड्या शुद्ध पाण्याने गरज भागवावी लागली. जुने नाशिक येथील कथडा, खडकाळी, बागवानपुरा, नाईकवाडीपुरा, कोकणीपुरा, चौक मंडई, दूधबाजार, भद्रकालीसह अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
झाला.
गुरुवारपासून नियमित पाणीपुरवठा
बुधवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. तसेच, जलवाहिनी ह्यवॉश आऊटह्ण केल्यामुळे काही भागात गढूळ पाणीपुरवठा झाला. गुरुवारपासून नियमित स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे.
काही भागात गढूळ पाणीपुरवठा
कथडा, खडकाळी, बागवानपुरा, नाईकवाडीपुरा, कोकणीपुरा, चौक मंडई, दूधबाजार, भद्रकालीतील काही भागात गढूळ पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना बुधवारी दूषित पाणी प्यावे लागले.